विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित परफॉर्मन्स न दाखवताही अजितदादाच लाभार्थी, तरीही त्यांच्याच राष्ट्रवादीचे नेते भाजपला वेगळे विचार करण्याचा इशारा देताहेत, असे राजकीय चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.Though ajit pawar is gainer in mahayuti, NCP targets BJP
अजित पवार यांना बारामतीतून सुनेत्रा पवारांना निवडून आणता आले नाही. तरीपण अजितदादांनी त्यांना परस्पर राज्यसभेवर घेतले. शिवसेना – भाजपने त्यांना मूकसंमती दिली. असे असतानाही भाजप आणि संघाने महायुतीच्या पराभवाच्या केलेल्या चिकित्सेला अजितदादांच्या राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांची चिडचिड झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत. त्यावर, आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या नेत्याने तोफ डागली असून थेट वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.
अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मतदानात पिछाडीवर जावे लागले, तर मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनीही अजित पवारांच्या पक्षाने आपणास मदत न केल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. त्यामुळे, महायुतीत एकसूत्रता आणि एकोपा नसल्याचे समोर आले. त्यानंतर, निवडणूक निकालात अजित पवारांच्या आमदारांचा म्हणावा तेवढा फायदा भाजपला झाला नाही. याशिवाय अल्पसंख्याक समाजही अजित पवारांसमवेत न राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे, अजित पवार महायुतीच्या पराभवाचे “व्हिलन” ठरवले जात आहेत.
त्यावरुन, आता अमोल मिटकरी यांनी थेट इशाराच दिला आहे. भाजपच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दांत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, महायुतीत खटके उडत असल्याचं आता समोर आलं आहे.
आव्हाडांकडून अजितदादांची पाठराखण
अजित पवार यांना भाजप बळीचा बकरा करू पाहत आहे. उत्तर प्रदेशात मोदींना कमी मतं मिळाली, याला अजित पवार जबाबदार आहेत का??, याचं उत्तर भाजपने द्यावं. भाजपची मत संख्या कमी झाली, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांना कमी मते मिळाली. तिथं काय अजित पवार होते का??, छोट्या छोट्या कारणाने टीव्हीवर बोलणारी माणसं आता कुठे गेली? ऑर्गनायजरबाबत ते बोलत नाहीत. इकडून तिकडे उडाया मारणारे बोलूच शकत नाहीत. ज्यांना अजित पवार यांनी मोठं केलं, त्यांनी तरी किमान बोलायला हवं, असा टोला आव्हाडांनी अजितदादा समर्थकांना हाणला.
Though ajit pawar is gainer in mahayuti, NCP targets BJP
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार