विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्याना रेल्वे प्रवासाची (लोकल) मुभा द्यावी ,अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली असून प्रसंगी रेलरोको करू, असा इशारा दिला आहे. Those who have taken vaccine doses should be allowed to Travel In local Trains : Pravin Darekar urges Government
डोंबिवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, कर्जत ते कसारा मार्गावर हातावर पोट असणारा चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेआहेत. त्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार तसंच रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करेन. याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर भाजपतर्फे प्रखर आंदोलन करण्यात येईल .रेलरोको करावा लागला तरी भाजपा मागेपुढे पाहणार नाही, याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.
- लोकलच्या प्रवासासाठी आंदोलन करू : दरेकर
- दोन डोस घेतलेल्याना लोकलसाठी परवानगी द्या
- कर्जत ते कसारा मार्गावरचे चाकरमान्याना भुर्दंड
- राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार
- रेल्वे मंत्र्यांकडेही पाठपुरावा करणार आहे