• Download App
    'राजकीय पायताणे' उगारणाऱ्या गुंडांना रोखण्याची जबाबदारी सुद्धा प्रशासनाची ; कोणती कारवाई केली? १४४ कलमाचे काय झाले ? जनतेला पडला प्रश्न । Those who are showing 'political Boot's' should be prevented; It is also the responsibility of the administration to stop them , what about १४४ ; comman man question

    ‘राजकीय पायताणे’ उगारणाऱ्या गुंडांना रोखण्याची जबाबदारी सुद्धा प्रशासनाची ; कोणती कारवाई केली? १४४ कलमाचे काय झाले ? जनतेला पडला प्रश्न

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे सांगून त्यांना कराडमध्ये ताब्यात घेतले. पण, दुसरीकडे कोल्हापुरात पायताण उगारून ‘याला तर खबरदार’ म्हणणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर (गुंडावर ) कायदा आणि सुव्यवस्थेची हाकाटी पिटणाऱ्या प्रशासनाने कोणती कारवाई केली ?, असा प्रश्न सामान्यांना पडत आहे. Those who are showing ‘political Boot’s’ should be prevented; It is also the responsibility of the administration to stop them , what about १४४ ; comman man question

    राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला अडविणे म्हणजे लोकशाहीत व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. किरीट सोमय्या हे कोल्हापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात आहेत. त्यांना अडविणे अयोग्य आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. तो त्याला राज्यघटनेने दिला आहे. ‘विचारांची लढाई विचारांनी लढायची’ असे तत्वज्ञान एरवी सांगणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यानी चक्क ‘पायताणे हाती’ धरली आहेत. ती आता त्यांच्या खऱ्या विचारांची प्रतीके ठरली आहेत.



    पायताण घेऊन ‘याला तर खबरदार ‘ असा धाक दाखविणे आणि प्रशासनाकडून सुद्धा ‘इकडे येऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे,’ असे सोमय्या यांना सांगणे म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे. खरे तर पायताण उगारणाऱ्या गुंडांना पोसणारे कोण आहेत ? त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष नको का घालायला ? जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. त्यामुळे जमाव गोळा केलेल्या आणि पायताणे उगारलेल्या गुंडावर पोलिसांनी , प्रशासनाने काय कारवाई केली? , असा प्रश्न जनतेला पडला आहे. ‘ आपल्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर पायताण उगारा,’असे सांगणाऱ्या नेत्यांच्या मुसक्या प्रथम प्रशासनाने बांधल्या पाहिजे होत्या. सोमय्या हे एकटे आहेत आणि जमाव मोठा आहे. जमावाला खरे तर प्रशासनाने अडविले पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था जमाव मोडत असून सोमय्या मोडत नाहीत.

    कराड- राजकीय जोडे यांचे नाते अतूट

    कराड आणि राजकीय जोडे यांचे अतूट असे नाते आहे. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण हे कराडचे सुपुत्र आहेत. आणीबाणी काळात १९७५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत यांनी चक्क यशवंतराव चव्हाण यांना संमेलनाच्या प्रवेशद्वारावर ‘राजकीय जोडे’ काढून ठेवा आणि मग संमेलनस्थळी पाऊल टाका ,असे ठणकावले होते. कारण त्यावेळी सरकारने आणीबाणी लागू करून जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. या संतापातून त्यांनी असे म्हंटले होते. पण, आता कोल्हापूरला जाणाऱ्या किरीट सोमय्या यांना अडविणे हा प्रकार राज्यात जणू काही आणीबाणी लागू असल्यासारखाच वाटतो आहे. एखाद्या व्यक्तीला प्रवासापासून रोखणे कोणत्या लोकशाहीत बसते ? दुसरीकडे कोल्हापुरात ‘जोडे’ उगारून याल तर खबरदार असे म्हणत राष्ट्रवादीच्या गुंड मंडळीनी कोल्हापूर स्थानकात जो थयथयाट केला. हा प्रकार यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाच्या मंडळींना शोभणारा नाही.

    Those who are showing ‘political Boot’s’ should be prevented; It is also the responsibility of the administration to stop them , what about १४४ ; comman man question

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा