विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनावर काही पक्ष हे सोईची भूमिका घेत आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणे लावण्याचा त्यांचा डाव आहे. मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान त्यांनी रचलेय. पण तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तोंड भाजेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. Devendra Fadnavis
गेल्या दहा वर्षांत आमचं सरकार असतानाच मराठा समाजाला न्याय दिला, आरक्षण दिलं. त्या आधीच्या कोणत्याही सरकारने मराठा समाजासाठी काहीही केलं नाही असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लागावं अशी ठाकरे-पवारांची इच्छा असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणसाठी आंदोलन सुरू आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. काही पक्ष हे सोईची भूमिका घेत आहेत. ते ठाम भूमिका घेत नाहीत. तुमची कायदेशीर भूमिका काय आहे ते सांगा. ते समाजासमाजात भांडण लावत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करत आहेत असं फडणवीस म्हणाले.
शासनाची भूमिका सहकार्याची
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाची भूमिका सहकार्याची आहे. एखादं आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू असेल तर त्याला सहकार्य करणे, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर वाहतूक कोंडी होत आहे. काही लोक आडमुठेपणामुळे वागतात आणि पूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं, त्याची खबरदारी घ्यावी.”
न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्यवाही करेल
उच्च न्यायालयाने काही बंधने घालून दिले आहेत. त्यानुसार प्रशासन कार्यवाही करत आहे असं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, “मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी एक दिवस वाढवून मागितला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिस त्यावर कार्यवाही करतील. प्रशासन त्या संदर्भात सकारात्मक विचार करेल.”
मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या मागण्यांवर कायदेशीर आणि संविधानातील मार्ग काढावा लागेल. त्यासाठी एक समिती नेमली आहे असं फडणवीस म्हणाले. लोकांना कुठेही त्रास होईल असं कुणीही वागू नये. चर्चेतून मार्ग निघेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी-मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचा डाव
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत अशी आपली इच्छा आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आम्हीच केलंय. या समाजात उद्योगासाठी मदत केली आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या योजना राबवल्या आहेत. मराठा समाजासाठी आम्ही सकारात्मक आहोत. त्या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत.
काही लोक जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी तसं करू नये, नाहीतर त्यांचं तोंड भाजेल. एकाला समोर करायचं, दुसऱ्याला नाराज करायचं. नंतर त्याला पुन्हा समोर करायचं. एकमेकांमध्ये लढवायचं हे काम काही लोकांचं सुरू आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली.
समिती मागण्यांचा विचार करेल
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया काय आहे याचा समिती विचार करेल. या कमिटीला शासनाचे सर्व अधिकार आहेत. त्यामुळे या समितीचा निर्णय हा मंत्रिमंडळाचा निर्णय असेल.
Those who are making political noises over the Maratha movement will face consequences; Chief Minister Devendra Fadnavis warns!!
महत्वाच्या बातम्या
- Cotton : कापड व्यापारी 31 डिसेंबरपर्यंत टॅरिफमुक्त कापूस आयात करू शकतील; वस्त्रोद्योग क्षेत्राला 50% अमेरिकन टॅरिफपासून वाचवण्याचा निर्णय
- Justice Nagaratna : न्यायमूर्ती नागरत्ना SCच्या कॉलेजियमशी असहमत; न्यायमूर्ती विपुल पंचोलींच्या SCत नियुक्तीवर आक्षेप
- जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!
- Commonwealth Games : 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारत बोली लावणार; मंत्रिमंडळाची मंजुरी, अंतिम मुदत 31 ऑगस्ट