हा उपक्रम भारत सरकार व अणुऊर्जा नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबवला जाणार असून,
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे महानिर्मिती आणि रशियाच्या रोसातोम (ROSATOM) कंपनीमध्ये थोरियम इंधनावर आधारित स्मॉल मॉड्युलर रिऍक्टरच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या करारानुसार महाराष्ट्रात थोरियम अणुभट्टीचा संयुक्त विकास, अणुऊर्जा नियामक मंडळ (AERB) च्या सुरक्षा निकषांनुसार त्याचे व्यावसायिकीकरण, तसेच ‘मेक इन महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत थोरियम अणुभट्टीसाठी असेंब्ली लाईनची स्थापना केली जाणार आहे.
हा उपक्रम भारत सरकार व अणुऊर्जा नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबवला जाणार असून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) हे धोरणात्मक पाठबळ देतील. यासाठी विशेष संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असून, महानिर्मिती, मित्रा, रशियाची रोसातोम आणि ग्लोबल टेक्नॉलॉजी अलायन्स या संस्थांच्या प्रतिनिधींचा यात सहभाग राहणार आहे.
यावेळी रशियाचे प्रतिनिधी मुंबईचे रशियन फेडरेशनचे महावाणिज्यदूत इव्हान वाय. फेटिसोव्ह, रशियन दूतावासचे युरी ए. लायसेन्को, भारत व रोसातोमचे भारतातील प्रतिनिधी काउन्सेलर, महाजेनको तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
MoU for development of thorium reactor in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Tahawwur Rana : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर भाजपचा काँग्रेसवर निशाणा, म्हटले…
- याला म्हणतात मोदींची “अंधभक्ती”; बिहारमध्ये काँग्रेसने इच्छुकांना लावले सोशल मीडियाच्या नादी!!
- Mumbai : मोठी बातमी! ११-१२ एप्रिल रोजी मुंबईला जाणाऱ्या तब्बल ३३४ रेल्वे रद्द
- Rajnath Singh : युक्रेन-रशिया संघर्षात ड्रोन ठरताय सर्वात जास्त हानिकारक शस्त्र – राजनाथ सिंह