प्रतिनिधी
मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात मोर्चे काढणाऱ्या रझा अकादमीच्या म्होरक्यांना अटक करा. दहशतवादी संघटना रझा अकादमीवर बंदी घाला, असे आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.This terrorist organisation Raza academy is behind all the violonce and riots in different parts of Maharashtra
अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने काल विनापरवानगी मोर्चे काढले होते. त्या तील मोर्चेकर्यांनी ठिकठिकाणी दगडफेक केल्या होत्या. त्याचे पडसाद आज अमरावतीत उमटले. हिंदू संघटनांनी बंद पुकारला आहे. आज अमरावतीत जमावबंदीचे 144 कलम लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
त्यालाच नितेश राणे यांनी ट्विटरवर आव्हान दिले आहे या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या मुख्य सुत्रधारांना कधी अटक करताय ते सांगावे. नाहीतर येणाऱ्या दिवसांत रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत.
रझा अकादमीने ठिकठिकाणी लावलेली पोस्टर्स नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केली आहेत. रझा आकादमी सगळीकडे दंगल घडविण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यावर बंदी घाला अन्यथा आम्हाला त्यांना संपवावे लागेल, असा इशारा देखील नितेश राणे यांनी ट्विट मधून दिला आहे.
महाराष्ट्रात 58 मराठा मोर्चे निघाले होते. ते सर्व मोर्चे शांततेत होते. पण काल चार शहरांमध्ये मोर्चे निघाले तेव्हा दगडफेक झाली. शांततेत मोर्चे काढायला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात. औरंगजेबाचे नव्हेत, याकडे देखील नितेश राणे यांनी आवर्जून लक्ष वेधले आहे.
This terrorist organisation Raza academy is behind all the violonce and riots in different parts of Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते, आपल्याला आपली अधिकृत भाषा मजबूत करण्याची गरज आहे – अमित शहा
- MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार
- अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश
- Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…