• Download App
    राजेश्वरी खरातची ही पोस्ट होतीये व्हायरल | This post by Rajeshwari Kharat has gone viral, lets know why

    राजेश्वरी खरातची ही पोस्ट होतीये व्हायरल

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : फॅन्ड्री सिनेमातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. कधी तिच्या फॅशन सेन्समुळे, कधी बोल्ड फोटोजमुळे, कधी तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे. राजश्री नेहमीच चर्चेत असते. नागराज मंजुळे यांच्या फँड्री हा चित्रपट प्रचंड सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून ग्रामीण महाराष्ट्राचं धगधगते समाजवास्तव प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले होते.

    This post by Rajeshwari Kharat has gone viral, lets know why

    चित्रपटातील जब्या आणि शालुच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. नुकताच राजेश्वरी खरातने ‘रेडलाइट’ नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. रेडलाइट परिसरात काम करणाऱ्या महिलाबाबत विदारक वास्तव या शॉर्टफिल्ममध्ये मांडण्यात आले आहे आणि याबाबतीत तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मिडीयावर ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ती या आपल्या पोस्टमध्ये लिहिते,


    पुण्यात देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये ७ कोटीचे अर्थसहाय्य जमा


    “तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या. स्त्रीने असे काम करणे योग्य नव्हे. परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो. गल्लीकडे येताना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडावेळसाठीच खेळणं घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईलच्या रिचार्ज पेक्षा कमी किंमत देता. सर्वांना हे खेळण आयुष्यात एकदातरी पाहिजे असतच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिंमत ठेवतात का? नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात,”

    “समाजात आणखी बर्‍याच काही गोष्टी वेश्येबद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्त ऐकून मजा घेतात. कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा. ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत,” अशी विनंतीही तिने तिच्या या पोस्टमधून केली आहे.

    This post by Rajeshwari Kharat has gone viral, lets know why

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!