• Download App
    महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्टसाठी 45000 कोटी रुपयांची गुंतवणूक; फडणवीस यांनी घेतली बैठकThis is a first of its kind unique project globally and is of about ₹45,000 crore.

    महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्टसाठी 45000 कोटी रुपयांची गुंतवणूक; फडणवीस यांनी घेतली बैठक

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातून गुजरातला बडे प्रकल्प गेले, अशी हाकाटी विरोधी पक्ष पिटत असताना महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन मधील स्वच्छ ऊर्जा या विषयावर काम करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक बैठक घेतली. This is a first of its kind unique project globally and is of about ₹45,000 crore.

    विनीत मित्तल यांच्या avaada group बरोबर झालेल्या विस्तृत चर्चेत महाराष्ट्रात तब्बल 4500 हजार कोटी रुपयांचा ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट उभारण्यासंदर्भात विचारविनिमय झाला. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

    स्वच्छ ऊर्जे संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. किंबहुना सौर ऊर्जा निर्मिती आणि वापरा संदर्भात भारताने जागतिक पातळीवर पुढाकार देखील घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रीन हायड्रोजन प्रकल्प महाराष्ट्रात उभा राहणे याला विशेष महत्त्व आहे. हा देशातलाच नव्हे, तर जगातला हा पहिला युनिक प्रकल्प ठरेल आणि त्याची गुंतवणूक सुमारे 45000 कोटी रुपये असेल, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

    This is a first of its kind unique project globally and is of about ₹45,000 crore.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस