विशेष प्रतिनिधी
पुणे : हम दिल दे चुके सनम, आजोबा अशा बऱ्याच सिनेमांमध्ये प्रमुख आणि उत्तम भूमिका साकारणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी एक मोठे विधान केले आहे. ब्राह्मण महासंघाच्या वतीने सन्मान सोहळ्यात मोदींजी बद्दल बोलताना ते म्हणतात, जे 70 वर्षांत झाले नाही, ते मोदी सरकारने करून दाखवले आहे. सेना आणि भाजप युती तुटल्याबद्दल मला अतिशय वाईट वाटते. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि हे सरकार स्थापन होणे हा जनाधाराचा अपमानच आहे.
This country will never be green but it will remain saffron, which has not happened in 70 years, as the Modi government has done; Actor Vikram Gokhale
पुढे ते म्हणतात, या देशाला बाबासाहेब आंबेडकर कधी कळालेच नाही. आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कधीच कोणासोबत होऊ शकत नाही. लाल बहादूर शास्त्री सोडून आत्तापर्यंतच्या सर्वच्या सर्व पंतप्रधानांना मी 100च्या खाली गुण देईन. लालबहादूर शास्त्री यांची जयंती ही दोन ऑक्टोबरला येते. ती हेतुपुरस्कर पुसली जाते. या गोष्टीचा आपल्याला विसर पाडला जातो.
हिंदू मुस्लिम मुद्यावर बोलताना ते म्हणतात, हा देश कधीही हिरवा होणार नाही तर तो भगवाच राहिल. जे 70 वर्षांत झाले नाही, ते मोदींनी करून दाखवले आणि मोदी चांगले काम करतात.
भाजप शिवसेना युती तुटली याबद्दल त्यांनी अतिशय खंत व्यक्त केली आहे. या बद्दल ते म्हणतात, भाजप आणि शिवसेना यांची युती तुटणं हे चुकीचं होतं. आणि स्वतः फडणवीस यांनी देखील माझ्याशी बोलताना ही गोष्ट मान्य केली होती. तर भाजप आणि सेनेची पुन्हा युती व्हावी यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहे. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
This country will never be green but it will remain saffron, which has not happened in 70 years, as the Modi government has done; Actor Vikram Gokhale
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी