शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. This agitation has been started by the workers, so the decision should be taken by them now: Gopichand Padalkar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे.यावर काही तोडगा निघत नव्हता. दरम्यान काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे दोन बैठका झाल्या. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा अनिल परब यांनी केली.
शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. ही पगारवाढ नोव्हेंबरपासून देऊ असंही सरकारने म्हटलं.काल झालेल्या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, प्रशासनातील अधिकारी, एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनधी तसंच आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत सहभागी झाले होते.
यावेळी कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ मान्य नाही आम्हाला विलिनीकरणच हवं आहे या मागणीवर कर्मचाऱी ठाम आहेत. या आंदोलनाविषयीचा निर्णय आता कामगारांनीच घ्यावा, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.आज यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन आहे त्यामुळे यादिवशी कामगारांनी निर्णय घ्यावा, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
पडळकर यांनी पत्रकार परिषदेत आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची घोषणा केली. बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की चालूच ठेवायचे हे कामगारांनी ठरवावे. आंदोलन चालू ठेवले तरी आमचा त्यांना पाठिंबा राहिल पण हा निर्णय एसटी कामगारांनी घ्यावा, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
This agitation has been started by the workers, so the decision should be taken by them now: Gopichand Padalkar
महत्त्वाच्या बातम्या
- वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांच्या नव्या पुस्तकामुळे काँग्रेसच सापडली अडचणीत
- मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांची न्यायालयात हजेरी
- जयललितांच्या निवासाचे स्मृतिस्थळ करण्यास न्यायालयाची स्थगिती, अण्णा द्रमुकला धक्का
- उत्तर प्रदेशात विरोधकांच्या हालचाली वाढल्या, अखिलेश यांनी घेतली विविध नेत्यांची भेट