विशेष प्रतिनिधी
सांगली : गणेश चतुर्थीच्या आगोदर म्हणजे आज सांगलीच्या गणपती मंदिरामध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.श्री गजानन हें सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे.Thief Ganapati secretly installed In Sangli
चोर गणपती बसवण्याची येथे शतकाची परंपरा आहे. गणेश चतुर्थी आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. मात्र कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भक्तांनी बाप्पाचे बाहेरूनच दर्शन घेतले..
- सांगलीत चोर गणपतीची केली गुपचूप प्रतिष्ठापना
- इतरत्र गणेश चतुर्थीला होते गणेशाचे आगमन
- सांगलीत अगोदरच गणेशाचे आगमन होते
- कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना
- या प्रथेला चोर गणपती , असे म्हणतात.
- सांगलीमध्ये दोनशे वर्षापासून परंपरा सुरु आहे
- चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली
- हा दीड दिवसांचा गणपती असतो
- मुर्तीचे विसर्जन केले जात नाही जतन केले जाते
- मुर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवले जाते