विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद दिले जाण्याची चर्चा होती. सलग तीन वेळा निवडून येऊनही त्यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. राज्यात मंत्रीपदासाठी विचार होत नसताना प्रणिती यांना कॉँग्रेसने उत्तर प्रदेशात स्टार प्रचारक म्हणून जाहीर केले आहे.There was no thought for a ministerial post in the state and Praniti Shinde was made a star campaigner in Uttar Pradesh
सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या प्रणिती यांना 2019मध्ये मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं. मात्र, आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपदं आल्याने प्रणिती यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. युतीच्या काळात सोलापूरकडेही मंत्रिपद होतं. सुभाष देशमुख हे कॅबिनेट तर विजयकुमार देशमुख हे राज्यमंत्री होते.
त्या आधी उत्तमप्रकाश खंदारेही मंत्री होते. मात्र, तरीही प्रणिती यांना मंत्रीपद दिले गेले नाही. उलट पहिल्यांदाच निवडून आलेल्या विश्वजित कदम यांना मंत्रीपद बहाल करण्यात आले.प्रणिती शिंदे या वयाच्या 28व्या वर्षीच आमदार झाल्या. 2009मध्ये त्यांनी सोलापुरातून पहिली निवडणूक लढवली.
पहिल्याच निवडणुकीत त्यांनी 33 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. सलग तीन वेळा त्या विधानसभेवर निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असतानाही त्या निवडून आल्या होत्या.
कॉँग्रेसने आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यात आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही स्टार प्रचारक म्हणून समोर आणण्यात आले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने एकूण ३० स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे.
ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वडेरा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह गुलामनबी आझाद, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सलमान खुर्शीद, भुपेंद्रसिंग हुडा, सचिन पायलट, प्रमोद तिवारी, हार्दीक पटेल आदींची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. चर्चेत असलेले चेहरे कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल यांचीही नावे यादीत आहेत.
प्रणिती वडील सुशीलकुमार शिंदे हे स्टार प्रचारक म्हणून निवडले जात होते. पण त्यांची राजकीय वाटचाल आता निवृत्तीच्या दिशेने होऊ लागली असून त्यांच्या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे यांना स्थान देण्यात आले आहे.
There was no thought for a ministerial post in the state and Praniti Shinde was made a star campaigner in Uttar Pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- शासकीय वसतीगृहाचा वापर तात्पुरत्या कारागृहासाठी
- महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड पंतप्रधानांनी बालकांशी संवाद साधला
- सहकार सम्राटांविरुध्द अण्णा हजारे यांचा एल्गार, सहकार साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, अमित शहांना लिहिले पत्र
- पेण : शिर्की चाळ नंबर 2 येथील सागरवाडीत शॉर्टसर्कीटमुळे आग , संपूर्ण घर जळून खाक