• Download App
    विषारी औषधी सोडून मला मारून टाकण्याचे कारस्थान होते, नितेश राणे यांचा महाविकास आघाडीवर आरोप|There was a conspiracy to kill me by giving up poisonous drug, Nitesh Rane's allegation on Mahavikas Aghadi

    विषारी औषधी सोडून मला मारून टाकण्याचे कारस्थान होते, नितेश राणे यांचा महाविकास आघाडीवर आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे सरकारकडून मला मारण्याचा कट होता, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केला. विरोधी पक्षांच्या लोकांना सभागृहात येऊ द्यायचे नाही, त्यांना मारून टाकायचे, विषारी औषधी शरीरात सोडून विषयच संपवायचा असे कारस्थान महाविकास आघाडी सरकारचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.There was a conspiracy to kill me by giving up poisonous drug, Nitesh Rane’s allegation on Mahavikas Aghadi

    राणे म्हणाले, कोल्हापुरला मी रुग्णालयात भरती असताना माझ्या शरीरात चुकीचे औषध टाकून मला मारण्याचा कट होता. राज्यात ज्या प्रकारे पोलिस आणि प्रशासन वागत आहे. त्यावरुन असे वाटते की, खरंच राज्यात इतकी वाईट परिस्थिती आहे हे ऐकल्यानंतर मला विश्वास बसत नाही. विरोधी पक्षांच्या लोकांचे घर पाडण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत आहे.



    बीएमसीचे अधिकारी घरी पाठविले जात आहेत. 12 वर्षे घरांचे अनाधिकृत बांधकाम दिसले नाही, आताच कसे दिसले. आम्ही त्यांना विचारतो की आदेश कुणी दिले तर वरून आदेश आहे असे ते सांगतात. त्यांना आदेश कोण देते याबाबत बीएमसी कमीशनरचे सीडीआर तपासायला हवे. फक्त विरोधी पक्षातील लोकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे.

    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक झाली. त्यातील एका प्रकरणात मला गोवण्यात आले. पोलिसांचा वाईट अनुभव मला आला. कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात मला डॉक्टरांनी आग्रह केला की, सीटी, एन्जियो करण्याची गरज आहे. मी म्हणालो की मला याची गरज आहे असे वाटत नाही. पण त्यांचा आग्रहच होता. सर्व लोक सरकारचेच असतात असे नाही,

    काही लोक आमचेही असतात. त्यातीलच काही लोकांनी मला सांगितले की, सीटी, एन्जियो करु नका, त्या निमित्ताने शरीरात इंक सोडली जाते. हा तुम्हाला मारून टाकण्याचा कट आहे. कोणत्याही परिस्थितीत होकार देऊ नका असेही मला सांगण्यात आले. हा कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार आहे.

    माझ्या मेडीकल रिपोर्टवरून दिसून आले की, माझा रक्तदाब, शुगर लेव्हल कमी झालेली होती, तरीही रात्री अडीच वाजता दोनशे पोलिस मला डिस्चार्ज व्हावा म्हणून पाठविण्यात आले. अटक करून मला जेलमध्ये टाकण्यासाठी ते आले होते. पण पोलिसांनी जेव्हा माझी प्रकृती बघितली तेव्हा त्यांना माझ्या प्रकृतीची जाणीव झाली. माझे रिपोर्ट खरे आहेत तरीही मला कलानगर मुंबई परिसरातून फोन येत होते. अटक होण्यासाठी माझ्यावर दबाव येत होता.

    There was a conspiracy to kill me by giving up poisonous drug, Nitesh Rane’s allegation on Mahavikas Aghadi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!