प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर आता बोलण्यात काही अर्थ उरला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर खंत बोलून दाखवली. एकनाथ शिंदे झाल्यानंतर सर्व घटनाक्रमामध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका, असा सल्ला दिला होता. पण तो सल्ला उद्धव ठाकरे यांनी मानला नाही. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांचे सरकार परत आणता आले असते, असे वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकाल पत्र वाचनात केले. या पार्श्वभूमीवर पवारांनी बोलून दाखवलेली खंत महत्त्वाची आहे. There is no point in talking about Uddhav Thackeray’s resignation now
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी, ११ मे रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष, तत्कालीन राज्यपाल यांच्यावर ताशेरे ओढत, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा ठाकरेंचे सरकार आले असते, असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निकाला दिला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया देऊन उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत आता चर्चेला काहीच अर्थ नाही, असे म्हटले आहे.
एकबाजूला गुरुवारी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचे वाचन सुरू असताना दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रात बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांची सिल्व्हरओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह छोटेखानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवार बोलत असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले की, ‘काही निर्णय अजून व्हायचे आहेत, असे मला वाटते. सुप्रीम कोर्टाने राज्यकर्त्यांविरोधात तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. राज्यपालांची भूमिका कशी चुकीची होती हे न्यायालयाने नोंदवले आहे. राजपालांच्या चुकीच्या भूमिकेचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे. पण आता तत्कालीन राज्यपाल नसल्यामुळे फार चर्चेला अर्थ नाही. तसेच आता उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत चर्चेला काहीच अर्थ नाही. मी “लोक माझे सांगाती” या पुस्तकातून राजीनाम्यासंदर्भात सविस्तर लिहिले आहे. काही जण मी मांडलेल्या भूमिकेवर नाराज झाले होते. पण यावर आता चर्चेला काही अर्थ नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित जोमाने काम करू.
There is no point in talking about Uddhav Thackeray’s resignation now
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरवर लवकरच करता येईल व्हिडिओ-ऑडिओ कॉल, एलन मस्क यांची घोषणा, नंबरची एक्सचेंज न करता बोलू शकाल
- धर्माशी संबंधित राजकीय पक्षांच्या नावावर सुनावणी, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राकडून 4 आठवड्यांत मागवले उत्तर
- सत्तासंघर्षावर आज निकाल, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठातील युक्तिवाद 16 मार्चला झाला होता पूर्ण; राज्यपालांचा आदेश रद्द होणार का? वाचा सविस्तर
- बँकांमध्ये 35,000 कोटींच्या ठेवी पडून, दावा करणारा कोणीही नाही; केंद्र सरकार आता अशा प्रकारे करणार परत, योजना तयार