• Download App
    कोविन अॅपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे बंधन नाही , आता केंद्रावरच थेट लस ;आरोग्य मंत्रालयाची माहिती There is no online registration restriction on the Covin app

    Corona Vaccination : कोविन अ‍ॅपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे बंधन नाही , आता केंद्रावरच थेट लस ;आरोग्य मंत्रालयाची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :कोरोना लसीकरणासाठी कोविन प्लॅटफॉर्वर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लोक ऑन दी स्पॉट लस घेऊ शकतात, अशी माहिती केंद्र सरकारने दिली. There is no online registration restriction on the Covin app

    देशात लसीकरण वेगाने व्हावे, यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. अगोदर नाव नोंदणी नंतर अपॉइंटमेंट घेणे आणि नंतर लस घेणे, ही प्रक्रिया तशी वेळकाढू होती. त्यामुळे सरकारने आता थेट लस घेण्याची संधी नागरिकांना दिली आहे.



    आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकात म्हटलं की, आता लसीकरणासाठी आधी रजिस्ट्रेशन करुन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. १८ वर्षांवरील नागरिक जवळच्या केंद्रावर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करुन लस घेऊ शकतात. या निर्णयामुळे ग्रामस्थ आणि मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

    कोरोना लसीकरणासाठी आधी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन अनिवार्य होतं. यावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला फटकारले होते.

    There is no online registration restriction on the Covin app

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा