राज्यात विजेची एकूण मागणी आणि तुटवडा यात माेठी तफावत आहे. राज्यात वीजेची मागणी २८ हजार मेगावॅटची असून आपल्याकडे २३ हजार मेगावॅटची वीज उपलब्ध आहे. त्यामुळे पाच हजार मेगावॅट वीजेचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे लाेडशेडिंगचे संकट आले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -राज्यातील काेळसाचे तुटवडा आणि वीज संकट याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कॅबिनेट बैठकीत गुरुवारी मुंबईत एक प्रेझेंटेशन दिले आहे. राज्यात विजेची एकूण मागणी आणि तुटवडा यात माेठी तफावत आहे. राज्यात वीजेची मागणी २८ हजार मेगावॅटची असून आपल्याकडे २३ हजार मेगावॅटची वीज उपलब्ध आहे. त्यामुळे पाच हजार मेगावॅट वीजेचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे लाेडशेडिंगचे संकट आले आहे अशी माहिती मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवर यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बाेलताना दिली. There is big gap between power demand and supply we will face load shading challenge says minister Vijay vadettivar
वडडेटीवर म्हणाले, अशापरिस्थितीत आपल्याकडील सर्वात माेठे जलसाठा असलेल्या १०२ टीमसी क्षमतेच्या काेयना धरणात सध्या १७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याठिकाणी १७०० ते १८०० मेगावॅट वीजनिर्मिती हाेते परंतु जलसाठा कमी झाल्याने त्याच्यावरही परिणाम हाेण्याची शक्यता आहे. अनेक वीज केंद्रात दाेन ते तीन दिवसांचा काेळसा साठा शिल्लक आहे. एकूण काेळशाचे उत्पन्न ही मागील काही वर्षात कमी झाले आहे.
गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यात महाराष्ट्रातील खाणीतून काेळसा जात आहे. त्याचा एकूण उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे आवश्यक असलेला काेळशाचा साठा राज्यात उपल्बध नाही. भुसावळला एक दिवसच वीज निर्मिती केंद्रात काेळसा पुरेल शिल्लक आहे. अशापरिस्थितीत तातडीने इतर ठिकाणावरुन वीज खरेदी करावयाची याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. काेणकाेणत्या ठीकाणावरुन वीज खरेदी करावयाची आणि त्याचा दर काय ठेवयाचा याबाबतही शुक्रवारी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. तातडीने आपण उपाययाेजना करु शकलाे नाही तर लाेड शेडिंगला सामाेरे जावे लागेल अशी सध्याची राज्यातील वीजेची एकंदर परिस्थिती आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
There is big gap between power demand and supply we will face load shading challenge says minister Vijay vadettivar
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी तरुण अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे – लेफ्टनंट जनरल जे एस नैन
- ईडीने बिटकॉईन प्रकरणात घेतली पुणे पोलिसांकडून माहिती
- कर्नाटकात लाऊडस्पीकरच्या आवाजांमुळे मशिदींना नोटीसा
- Pawar Men : “पवारांची माणसे” आणि त्यांचे भूतकाळात गेलेले राजकीय भवितव्य!!
- फिलिपाइन्ससोबतचा ब्राह्मोस करार द्विपक्षीय; रशियावरील निर्बंधांचा परिणाम होणार नाही