शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या त्या विधानाची आठवण करून देत मनसेचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून मनसेने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे, याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मनसेकडून प्रश्न विचारण्यात आला आहे. Then Uddhav Thackeray why were the Maharashtra soldiers harassed when you were the Chief Minister MNS direct question
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून ट्वीटद्वारे म्हटले गेले आहे की, “शिवसेना सत्तेत असताना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही. असं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना सांगितल्याचा प्रसंग उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितला. मग उद्धव ठाकरे, आपण मुख्यमंत्री असताना मशिदींवरील त्रासदायक भोंगे उतरावेत ह्यासाठी सनदशीर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना त्रास का दिला गेला?’’
याशिवाय ‘’१७००० महाराष्ट्र सैनिकांवर गंभीर स्वरूपाचे खटले का भरले गेले?, आंदोलक महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई करताना ‘विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही’ हा बाळासाहेबांचा विचार तुम्ही विसरला होता का? ‘मशिदींवरील त्रासदायक भोंगे खाली यावेत’ या बाळासाहेबांच्या इच्छापूर्तीसाठी आंदोलन करणं हा महाराष्ट्र सैनिकांचा गुन्हा होता का?’’ असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरेंना थेट विचारण्यात आले आहेत.
तर, ‘’विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सांगतात कि, “आमचं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचे आहे.” मग भोंगे आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक मुला-मुलींवर माविआ सरकारने भरलेले खटले आपण केव्हा मागे घेणार?’’ असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मनसेने विचारला आहे.
याचबरोबर ‘’महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत आपली वाटचाल करत आहे पण एखाद्या प्रश्नावर आंदोलन करताना जेव्हा सरकारी बळाचा वापर करून, गंभीर स्वरूपाचे खटले भरून राजकीय कार्यकर्त्यांना आयुष्यातून उठविण्याचे जे प्रकार होतात ते बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक म्हणवणाऱ्यांकडून होऊ शकत नाहीत ! आता ते का झाले, ह्याचं उत्तर उमगण्यास आपण सुज्ञ आहेत.’’असंही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटलं आहे.
Then Uddhav Thackeray why were the Maharashtra soldiers harassed when you were the Chief Minister MNS direct question
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात एक लाखाहून जास्त काश्मिरी पंडित होणार मतदार, भाजपने म्हटले- काश्मिरी पंडितांना लोकशाही अधिकार देण्याच्या दिशेने मोठे पाऊल
- कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांनी राहुल गांधींविरोधात दाखल केला मानहानीचा खटला
- ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!