राज्यपालांचे अधिकार कमी होणार आहेत.विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत. …. then the universities will be ruined; Chitra Wagh’s Ghanaghat
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल (२८ डिसेंबर) विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. मात्र शेवटचा दिवस विरोधकांच्या गोंधळानेच सर्वाधिक गाजला. काल राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक गोंधळात मंजूर करण्यात आले.मात्र या विधेयकाला भाजपने विरोध केला असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आल्याने टीका केली आहे.
नेमक्या काय म्हणाल्या चित्रा वाघ
विद्यापीठांना सरकारी महामंडळ करण्याचं काम सुरू आहे.विद्यापीठांवर सरकारचा ताबा आणला जात असून सगळे अधिकार थेट मंत्री घेत आहेत. यामुळे विद्यापीठाचा सत्यानाश होईल. तुमच्या PA कडे रांगा लागतील. मर्जीनुसार कोर्सेस तयार केले जातील. असा घणाघात चित्रा वाघ यांनी ट्वीट करत केला आहे.
दरम्यान राज्य सरकारच्या या विधेयकामुळे आता राज्यपालांचे अधिकार कमी होणार आहेत.विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत.तसेच राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्र-कुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे. या प्र-कुलपतीपदी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत.