विशेष प्रतिनिधी
मुबंई : मागील जवळपास दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमूळे अनेक उद्योगधंदे तसेच मंदिरे, सिनेमागृह बंद ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र आघाडी सरकारने काल जाहीर केलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील मंदिरे ४ आक्टोबरपासून दर्शनासाठी सुरू केली जाणार आहेत.
Theatres and multiplex in maharashtra will open from October 22
तर महाराष्ट्रातील सिनेमागृहाच्या मालकांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्रातील सिनेमागृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंबंधीच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काही कालावधीनंतर जाहीर करण्यात येणार आहेत असे देखील सांगितले आहे.
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, पीव्हीआर आणि आयनॉक्स यासारख्या मल्टिप्लेक्सच्या मालकांनी महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्रातील सिनेमागृहे सुरू करण्यात यावी यासंबंधी विनंती पत्र लिहिले होते. त्यांच्या या मागणीनंतर दोन आठवड्यांमध्येच महाराष्ट्र शासनाने सिनेमागृहे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार चित्रपट प्रदर्शन क्षेत्रस मागील सहा महिन्यांमध्ये सुमारे 9000कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. बऱ्याच लोकांच्या उपजीविकेचे साधन असणारे चित्रपट प्रदर्शन क्षेत्र यापुढे कोणतेही नुकसान सहन करू शकणार नाही. असे देखील त्यांनी आपल्या विनंती पत्रामध्ये शासनाला लिहिले होते.
मागिल एक वर्षामध्ये बरेच मोठे सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज होते पण चित्रपटगृहे बंद असल्यामुळे हे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते. थलाईवी, बेलबॉटम, सडक २, हसीन दिलरुबा, लूटकेस असे अनेक बिग बजेट सिनेमे चित्रपटगृहे बंद असल्याच्या कारणाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते.
Theatres and multiplex in maharashtra will open from October 22
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील निर्बंध ऑक्टोबरपासून शिथिल; पालकमंत्री अजित पवार यांचे कोरोना आढावा घेतल्यावर संकेत
- सबका साथ, सबका विकास, आत्मनिर्भरता, स्टार्ट अप्स, स्किल डेव्हलपमेंट संकल्पनांची मूळे दीनदयाळजींच्या “सबको काम” अर्थनीती मध्ये!!
- मार्क्सवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले, त्यांच्यावर कधी सोडली का सीबीआय!!; ममतांचा भाजपला टोला
- WOMEN IN NDA : एनडीए प्रवेशासाठी UPSC ने महिला उमेदवारांकडून मागविले अर्ज