विशेष प्रतिनिधी
पिंपरी : सीएच्या (सनदी लेखापाल) परीक्षेत अपयश आल्याने पिंपरी चिंचवड येथील तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. गुरुवारी सीए परीक्षेचा निकाल लागला होता.The young woman committed suicide by hanging herself after failing the CA exam
पल्लवी संजय जाधव (२४, रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पल्लवी सीए होण्यासाठी अभ्यास करत होती. त्यासाठी तिने यापूर्वी दोन वेळा ही परीक्षा दिली होती. मात्र, दोन्ही परीक्षेत ती अपयशी ठरली.
त्यानंतर तिने पुन्हा तिसऱ्यांदा परीक्षा दिली होती.या परीक्षेचा निकाल कल जाहीर झाला. निकाल पाहिल्यापासून ती घरात कोणाशीच बोलत नव्हती.आज सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पल्लवी पुन्हा परीक्षेत अपयशी ठरल्याने तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.
The young woman committed suicide by hanging herself after failing the CA exam
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : प्रक्षुब्ध करणारं किंवा रोष वाढवणारं वक्तव्य करू नये, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन
- पाचशे रुपयाला एक आंबा, पुण्यात हापूसच्या पाच डझनच्या पेटीला 31हजार रुपये भाव
- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडवली; राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!!
- सब में डालो फूट, मिलकर करो लूट!!; उत्तराखंडात काँग्रेसवर पंतप्रधान मोदींचा पुन्हा हल्लाबोल!!