• Download App
    कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी महिला बनली ऑटोचालक चार महिन्यापूर्वीच पतीचा झाला कोरोनाने मृत्यू|The wido became the Auto driver for His Family

    WATCH : कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी महिला बनली ऑटोचालक चार महिन्यापूर्वीच पतीचा झाला कोरोनाने मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ : कोरोनाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंब कोलमडून पडली. कोरोना आजाराने चार महिन्यापूर्वी पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे म्हातारे सासू सासरे, पाच मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी एका विधवा महिलेवर आली. अखेर पतीच्या ऑटोलाच तिने उदरनिर्वाहाचे साधन बनविलेThe wido became the Auto driver for His Family

    कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी ऑटो चालक बनलेल्या विधवा महिलेला शासनाने आर्थिक पाठबळ देण्याची मागणी केली जात आहे.नेर तालुक्यात परजना गावात अशोक जाधव हा तरुण ऑटो व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. चार महिन्यापूर्वी त्याचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. विधवा पत्नी अरुणा जाधव यांनी अखेर पतीची रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्याचा निर्धार केला.


    रशियाने कोरोनाने झालेले मृत्यू लपविले, दरवर्षीच्या सरासरीपेक्षा तब्बल सव्वा चार लाख जादा मृत्यू


    परजना गावापासून नेर शहराचे ठिकाण २२ किलोमीटर अंतर आहे. येथून प्रवासी नेण्या-आणण्याचे काम त्या करीत आहे. त्यातून दिवसाला किसेबसे दोनशे रुपये हातात पडतात. आईला हातभार लागावा म्हणून मोठी मुलगी अमृता घरातील कामे आटोपून शेतात मजुरीला जाते.

    महिलेला दोन मुली व तीन मुले आहेत. त्यांना पोलिस, सैनिक, अधिकारी, जिल्हाधिकारी व्हायचे आहे. आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारने जबाबदारी घ्यावी, अशी आर्त विनवणी अरुणा जाधव यांनी केली.मुलगी अमृता आठवीत, अर्पिता पाचवीत, यश चौथीत ,उत्कर्ष सहाव्या वर्गात तर लहान मुलगा आदर्श अंगणवाडीत शिक्षण घेत आहे.

    • कुटुंबासाठी महिला बनली चक्क ऑटोचालक
    • पतीच्या मृत्यू झाल्याने कुटुंब कोलमडून पडले
    • अरुणा जाधव या ऑटोचालक बनल्या आहेत
    •  सासू सासरे, पाच मुलांच्या पालनपोषण जबाबदारी
    • मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी

    The wido became the Auto driver for His Family

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!