• Download App
    रेरा, तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून साडेदहा हजार दस्तांची नोंद - ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश। The violation of Real Estate (Regulation and Development) Act, 2016 government strict action against ४४ officer and suspend them

    रेरा, तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून साडेदहा हजार दस्तांची नोंद – ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

    पुणे शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये स्थावर मालमत्ता विकास आणि नियमन कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मालमत्ता खरेदी-विक्रीचे बेकायदा दस्त नोंदविल्याचे उघड झाले आहे. The violation of Real Estate (Regulation and Development) Act, 2016 government strict action against ४४ officer and suspend them


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये स्थावर मालमत्ता विकास आणि नियमन कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मालमत्ता खरेदी-विक्रीचे बेकायदा दस्त नोंदविल्याचे उघड झाले आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्यानुसार कारवाईची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

    चहुबाजूने वाढणाऱ्या पुणे शहरासह जिल्ह्यात रेरा आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचे बेकायदा दस्त नोंद होत असल्याची तक्रार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने पुणे शहरातील सर्व २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमधील संशयित दस्तांची तपासणी करण्यासाठी खास समिती गठित केली होती. याबाबत गेल्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळ अधिवेशनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बेकायदा दस्त नोंदणी झाल्याची कबुली दिली होती.



    शासननियुक्त समितीने केलेल्या तपासणीत शहरातील हवेली क्र. तीन आणि इतर कार्यालयांत ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहा हजार ५६१ दस्त नोंद केल्याचे समोर आले. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणी यापूर्वीच ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. नऊ जणांची विभागीय चौकशी सुरू असून बदलीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. नऊ जणांची विभागीय चौकशी सुरू असून, आठ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात कनिष्ठ लिपिकांवर कारवाई करण्यात येत आहे, असे नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड यांनी स्पष्ट केले.

    अशी झाली बेकायदा दस्त नोंदणी

    रेरा कायद्यांतर्गत नोंद नसलेल्या प्रकल्पांमधील ४२४ सदनिकांची दस्त नोंदणी सन २०२०-२१ मध्ये झाल्याचे निदर्शनास आले. शेतजमिनीच्या हस्तांतरणाचे दस्त नोंदवताना तुकडे पाडण्यास प्रतिबंध असतानाही १११ दस्त हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक तीनमध्ये नोंदवण्यात आले आहेत. तसेच खरेदी-विक्री करणारे पक्षकार हजर नसतानाही ते हजर असल्याचे दाखवून अन्य खासगी व्यक्तींद्वारे दस्त नोंदवण्यात आले. सन २०२० मध्ये २९ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत नोंदणी झालेल्या १०३५ दस्तांच्या तपासणीत ६० दस्तांमध्ये अनियमितता आढळून आली होती. एकूण दहा हजार ५६१ दस्त बेकायदा पद्धतीने नोंद झाल्याचे ताशेरे समितीने उघडकीस आणले.

    The violation of Real Estate (Regulation and Development) Act, 2016 government strict action against ४४ officer and suspend them

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस