प्रतिनिधी
मुंबई : वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता माहिती अधिकारातून धक्कादायक खुलासा झाला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिरंगाई केल्यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचे सत्य माहिती अधिकारातून उजेडात आले आहे. The Vedanta Faxcan project went through the Mahavikas Aghadi, not the Shinde-Fadnavis government
तसेच, हा प्रकल्प महाराष्ट्रात थांबावा म्हणून महाविकास आघाडी सरकारने प्रयत्नच केले नाहीत, असेही सत्य यातून उघड झाले आहे. MIDC ने माहिती अधिकारातून ही माहिती दिली आहे. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारवर आरोप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
जानेवारी 2022 मध्ये वेदांता कंपनीने गुंतवणूकीसंदर्भात एमआयडीसीकडे अर्ज दिला होता. परंतु, त्यावर हाय पॉवर कमिटीची बैठक नवे सरकार अस्तित्वात आल्यावर म्हणजे जुलै 2022 ला झाली, अशी माहिती एमआयडीसीने दिली आहे. ठोस निर्णय घेण्यासाठी 6 महिन्यांत मंत्रिमंडळाच्या हाय पॉवर कमिटीची बैठकच झाली नसल्याचेही यातून उघड झाले आहे. दरम्यानच्या या सर्व काळात सत्तासंघर्षामुळे गुंतवणुकीकडे दुर्लक्ष झाल्याचे, यातून समोर आले आहे.
The Vedanta Faxcan project went through the Mahavikas Aghadi, not the Shinde-Fadnavis government
महत्वाच्या बातम्या