विशेष प्रतिनिधी
मुंबई : दादर नगर हवेली मध्ये लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या जागेवर निवडणूक लढवत आहेत. मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत प्रचारासाठी दादर नगर हवेलीचा दौऱ्यावर आहेत.The Union Railway Minister has been in Mumbai for the last five days for the by-election campaign. Did he sell the railways just like Air India did? : Sanjay Raut
या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री मागील पाच दिवसापासून मुंबईमध्ये आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जशी एअर इंडिया विकली तशी रेल्वेदेखील विकली का? रेल्वे मंत्रालयाला काही काम नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.
त्याचसोबत ते म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारासाठी गेले होते. पण तेथे ममता बॅनर्जी यांचाच विजय झाला. यावरून असे सिद्ध होते की, सत्याचाच नेहमी विजय होतो. आणखी कोणालाही प्रचारासाठी यायचे त्यांना येऊ दे. तुम्हाला जो बायडेन यांना घेऊन यायचं असेल….तर तसेही करा’ असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
प्रशासनाने हुकूमशाही पध्दतीने आपली ताकद वापरली तर निवडणुकींना काय अर्थ राहतो? असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी विचारला. लोकप्रतिनिधींचा आवाजात तुम्ही दाबत असाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जो काही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत, त्याचा काय उपयोग? सिल्वासा, दादर नगर हवेलीला आजही स्वातंत्र्य मिळालेले नाही. इथे प्रशासन लोकांना गुलाम असल्याचे मानते. हे तुमचे स्वातंत्र का? असा प्रश्नही यावेळी संजय राऊत यांनी मांडला आहे.
The Union Railway Minister has been in Mumbai for the last five days for the by-election campaign. Did he sell the railways just like Air India did? : Sanjay Raut
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड
- नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!