• Download App
    त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातले सत्य आणि सेक्युलर नॅरेटिव्हचे कुपथ्य!! The truth of sandal procession at tribakeshwar mandir and selective victim card secular narrative

    त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातले सत्य आणि सेक्युलर नॅरेटिव्हचे कुपथ्य!!

    त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात काही मुस्लिम युवकांनी संदलच्या मिरवणुकीच्या निमित्ताने घुसण्याचा प्रयत्न केला आणि राज्यभरात मोठा वाद तयार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटने संदर्भात गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तपासणी चौकशीसाठी एक एसआयटी नेमली गुन्हे नोंदविले गेले आणि तिथेच या विषयाला खरे वळण मिळाले. किंबहुना हाच या विषयातला टर्निंग पॉईंट ठरला आहे. त्र्यंबकेश्वर मधल्या या संपूर्ण घटनाक्रमाची नीट माहिती घेतली, तर या टर्निंग पॉईंटचे महत्व लक्षात येईल. The truth of sandal procession at tribakeshwar mandir and selective victim card secular narrative

    एसआयटीने चौकशी सुरू केल्याबरोबर संदलचे आयोजन करणारे सलीम सय्यद पुढे आले आणि इथून पुढे आपल्या आजोबांपासून चालत असलेली परंपरा बंद करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. मूळात आजोबांपासून ही परंपरा कशी किंवा सुरू झाली?, या बाबत मात्र त्यांनी तपशील दिले नाहीत. सुरुवातीला तर ते मीडियाच्या कॅमेरासमोर बोलायलाही तयार नव्हते. पण नंतर जेव्हा ते बोलले तेव्हा त्यांनी ही परंपरा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला पण यातून सत्यावर प्रकाश पडला का??, हा खरा प्रश्न आहे.

    त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन हिरवी सादर चढवण्याचा प्रयत्न ते मंदिराच्या दरवाजात उभे राहून त्र्यंबक राजाला फक्त धूप दाखविणे, असे वेगवेगळे नॅरेटिव्ह पुढे आले. पण पोलीस एसआयटीची चौकशी सुरू झाल्याबरोबर कशाला पाहिजे ही कटकट? आपण ही परंपरा बंद करू, असे सांगून सलीम या घटनेपासून “बाजूला” व्हायचा प्रयत्न करू लागले.

    स्थानिक वादाचे आवरण

    दरम्यानच्या काळात एक वेगळा नॅरेटिव्ह पण चालवला गेला, तो म्हणजे हा जो काही वाद आहे तो त्रंबकेश्वर ग्रामस्थांमधला आहे. शांतता समितीच्या बैठकीत तो सोडवू. बाहेरच्या संघटनांनी तिथे येऊन काही वाद निर्माण करू नये, असा हा नॅरेटिव्ह होता. जणू काही त्र्यंबकेश्वर हे बाकीच्या सर्व गावांपासून अलिप्त असणारे गाव आहे आणि तिथे बाहेरचे लोक येऊन वाद घालतात, असा सेक्युलर नॅरेटिव्ह पसरवण्यात आला. पण याच त्र्यंबकेश्वर गावची संपूर्ण अर्थव्यवस्था भाविक पर्यटकांच्यावर चालते हे मात्र जाणीवपूर्वक लपविण्यात आले.

    व्हिक्टीम कार्ड गेम

    त्या पलीकडे जाऊन ज्या मंदिरात मूळातच अहिंदूंना प्रवेश करायला संस्थांनच्या घटनेने बंदी आहे, तिथे संदलच्या मिरवणुकीच्या निमित्ताने लोक गेलेच का??, हा प्रश्न मात्र सोयीस्कर रित्या टाळला गेला. या प्रश्नाचे उत्तर सेक्युलर नॅरेटिव्ह चालवणाऱ्यांनी दिलेले नाही. उलट त्याला परंपरेचा मुलामा लावला गेला आणि प्रत्यक्ष जेव्हा एसआयटी चौकशी सुरू झाली आणि त्यातून काही सत्य बाहेर येण्याची भीती निर्माण झाली, तेव्हा मात्र परंपरा बंद करून टाकण्याची “व्हिक्टीम कार्ड” खेळले गेले.

    दर्ग्यात चालेल का सेक्युलर परंपरा?

    आता त्यापुढे जाऊन आखाडा परिषद या वादात उतरली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दरवाजात उभे राहून धूप दाखवण्याची परंपरा असेल, तर दर्ग्यात हनुमान चालीसा वाचण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आखाडा परिषदेने केली आहे. मग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दरवाजातून धूप दाखवण्याची “सेक्युलर परंपरा” चालते तशीच “सेक्युलर परंपरा” दर्ग्यामध्ये हनुमान चालीसा वाचून सुरू करायची का??, हा प्रश्न यातून उद्भवला आहे.

    The truth of sandal procession at tribakeshwar mandir and selective victim card secular narrative

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!