विशेष प्रतिनिधी
मुंबई :अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला.The truth cannot be hidden by criticizing BJP: Keshav Upadhyay’s criticism of Nawab Malik
उपाध्ये म्हणाले की, अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काही जणांना पकडले. याबाबत राज्याचे अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत. आरोपींना मदत होईल अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत.
त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच.
ते म्हणाले की, नवाब मलिक यांनी हे ध्यानात घ्यायला हवे की अटक केलेल्या आरोपींना एनसीबी कोठडीत ठेवायचे का, न्यायालयीन कोठडीत म्हणजे तुरुंगात पाठवायचे का किंवा जामीन द्यायचा याचा निवाडा न्यायालय करत आहे. त्या निमित्ताने तपासकामाची पडताळणी न्यायालयात होत आहे.
नवाब मलिक यांना वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जावे आणि आपले म्हणणे मांडावे. पण ते प्रत्यक्ष न्यायालयात न जाता केवळ मीडिया ट्रायलमधून तपासकामाबद्दल संशय निर्माण करत आहेत. ते विनाकारण भारतीय जनता पार्टीला यामध्ये ओढत आहेत. असे करून त्यांच्या मनाचे समाधान होईल पण आरोपींची सुटका होणार नाही.
The truth cannot be hidden by criticizing BJP: Keshav Upadhyay’s criticism of Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- क्रूज ड्रग्स रेव्ह पार्टीतून पकडलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाबा, अमीर फर्निचरवाला यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने का सोडले?; नवाब मलिक यांचा खोचक सवाल
- किंग खानला मोठा दणका : BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती रोखल्या, प्री-बुकिंग असूनही जाहिराती रिलीज केल्या नाहीत
- चिपी विमानतळ उद्घाटन : शेजारी खुर्च्या तरीही ना नमस्कार, ना नजरेला नजर, ठाकरे-राणेंमधील बेबनाव कार्यक्रमातही तसाच
- काँग्रेसचे नेते लखीमपूरच्या मुद्द्यात “अडकले”; अखिलेश यादव मात्र विजय यात्रेवर निघाले