विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा गुवाहाटी ते मुंबई व्हाया बुलढाणा दोन शिवसेनांमध्ये शाब्दिक झुंज जोरात सुरू झाली आहे. त्या पलिकडे जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक मध्ये सुषमा अंधारे यांचा दौरा होऊन देखील ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फुटण्याची जोरदार चर्चा आहे. पण या लढाईत कोण कोणाचे कसे नुकसान करणार?? आणि या नुकसानीचा तोटा कोणाला होणार आणि फायदा कोणाला पोहोचणार?? हा सगळ्यात कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. The true fight is between Shivsena and NCP, but quarrel is at peak between two Shivsenas
गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीचा दौरा केला. नवस फेडण्यासाठी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आणि त्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. आसामच्या मुख्यमंत्र्यांना शहाजी बापू पाटलांचा काय डोंगर काय हॉटेल सगळं ओक्के हा डायलॉग आवडला. त्याचे इंग्लिश भाषांतर “व्हॉट अ ग्रीनरी”, असे झाले. पण त्याच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात जाऊन जोरदार हल्लाबोल केला. खोके, बोके, रेडे भरपूर शब्दांची उधळण करून शिंदे गटाला ठोकून घेतले. शिंदे गटानेही त्याची चांगलीच परतफेड केली. फ्रीजच्या खोक्यातून मातोश्रीवर कसे आणि काय पोहोचले हे जाहीर करू, असे शिंदे गटाचे नेते प्रवक्ते दीपक केसरकर यांनी जाहीर केले. त्याला संजय गायकवाड यांनी दुजोराही दिला. संजय राऊत यांनी बुलढाण्याच्या सभेत 40 रेडे पाडणार. त्यांचा राजकीय बळी देणार, अशी घोषणा केली. पण या सगळ्या भांडणामध्ये 40 रेडे खरच पाडले, मातोश्री वरची खोकी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर केली, तर राजकीय इज्जत अब्रू नेमकी कोणाची जाणार?? आणि त्याचा लाभ नेमका कोणाला होणार?? हा कळीचा प्रश्न आहे.
खरा संघर्ष राष्ट्रवादीशी
हेच ते शिवसेनेचे 40 आमदार आहेत, ज्यांची स्थानिक पातळीवर त्यांच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांशी जोरदार टक्कर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दणका देऊनच ते विधानसभेत पोहोचले आहेत. आता त्याच 40 आमदारांना निवडणुकीत पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे, तर त्यांचे जुने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. म्हणजे 40 मतदारसंघांमध्ये टक्कर कोणामध्ये तर दोन शिवसेनांमध्ये. मूळ भांडण राष्ट्रवादीशी आणि निवडणुकीत टक्कर मात्र दोन शिवसेनांमध्ये… असे चित्र दिसणार आहे. मग याचा लाभ नेमका कोणाला होणार??, हे सांगायला कोणी कोणाला हात दाखवण्याची गरज नाही.
शिवसेनेच्या एकूण 56 आमदारांपैकी 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत, तर उरलेले 16 आमदार उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. पण त्या 16 आमदारांची तरी टक्कर कोणाबरोबर आहे??, तीही प्रामुख्याने राष्ट्रवादी बरोबरच आहे. मग आता महाविकास आघाडीत त्या 16 आमदारांच्या मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार गप्प बसून राहणार आहेत का?? शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना निवडणुकीच्या काळात बळ देणार आहेत का??, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
कारण जर शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना पाडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जोर लावणार असेल, तर शिंदे गटही शिवसेना आपल्या जुन्या पक्षप्रमुखांच्या निष्ठावंत आमदारांना सहजासहजी सोडेल का?? एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना पण उद्धव गटाच्या 16 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये ताकद लावणार नाही का?? आणि ती ताकद लावली की नुकसान कोणाचे होणार?? ठाकरे गटाचे शिंदे गटाचे?? की त्यांचे मूळ प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीचे??, याचाही अभ्यास करायला किंवा भविष्य सांगायला कोणत्याही ज्योतिषाला हात दाखवण्याची गरज नाही.
त्यामुळे भले निवडणूक मध्यावधी होवो किंवा नियमित होवो, जर ठाकरे गट शिंदे गटाचे 40 आमदार पाडणारच असेल आणि त्या बदल्यात शिंदे गट मातोश्रीवर जाणारे खोकी जाहीरच करणार असेल, तर त्याच्या तोटा नेमका कुणाचा होणार?? इज्जत अब्रू नेमकी कोणाची जाणार?? आणि त्याचा लाभ कोण उठवणार??, हे सहज समजण्यासारखे आहे!!
The true fight is between Shivsena and NCP, but quarrel is at peak between two Shivsenas
महत्वाच्या बातम्या
- बुद्धिवादी राष्ट्रवादी नेता हीच सावरकरांची खरी ओळख; दिल्लीच्या ‘प्रेस कॉन्फरन्स’मध्ये रणजित सावरकरांचे रॅपिड फायर
- ITBP Recruitment : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीची संधी, करा अर्ज
- Imam Remuneration : मशिदींच्या इमामांना करदात्यांच्या पैशातून वेतन हे संविधानाचे हनन; केंद्रीय माहिती आयुक्तांचा निर्णय