• Download App
    कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन विभागाने कंबर कसली ; भाविकांकरिता खासगी वाहनांची सोय । The transport department has tightened its belt so as not to inconvenience the devotees coming for Karthiki Yatra; Provision of private vehicles for devotees

    कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन विभागाने कंबर कसली ; भाविकांकरिता खासगी वाहनांची सोय

    पंढरपूर आगारातून शुक्रवारी परिवहन अधिकाऱ्यांनी थांबून जवळपास 50 खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरळीत केली. The transport department has tightened its belt so as not to inconvenience the devotees coming for Karthiki Yatra; Provision of private vehicles for devotees


    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर बेमुदत संप सुरू केला आहे. याचा राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. दरम्यान या संपाचा कार्तिकी यात्रेवरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे.यावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन विभागानेही कंबर कसली आहे.

    सोलापूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी माहिती दिली आहे की , पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांकरिता खासगी वाहनांची सोय केली आहे. खासगी वाहन मालकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या कार्तिकीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक खासगी वाहनांतून पंढरपूला येऊ लागले आहेत.



    50 खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरळीत

    पंढरपूर आगारातून शुक्रवारी परिवहन अधिकाऱ्यांनी थांबून जवळपास 50 खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरळीत केली. येथील बसस्थानकातून दिवसभरात सोलापूर, अकलूज, सांगोला, मंगळवेढा, टेंभुर्णी या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरळीत केली.

    तसेच परिवहन विभागाचे निरीक्षक महेश रायबान, सुखदेव पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सिद्धाराम कोलाटे, ऐश्वर्या धूल, धीरज डोईफोडे यांनी स्वतः थांबून प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, एसटी तिकिटापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाईल, असेही मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान यांनी सांगितले.

    The transport department has tightened its belt so as not to inconvenience the devotees coming for Karthiki Yatra; Provision of private vehicles for devotees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ