विशेष प्रतिनिधी
सोलापूर : बीड जिल्ह्यातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठ्याकडे ऊसतोडीसाठी मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातामध्ये एक महिन्याच्या लहान बाळ मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. The tractor’s trolley overturned one month Child died
ही दुर्घटना मोहोळ – नरखेड रस्त्यावर मोहोळ गावच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. भंडारकवठे साखर कारखान्याकडे भरधाव वेगाने जात असणारी ट्रॅक्टर ट्रॉली चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. यामध्ये अर्णव चव्हाण हा एक महिन्याचा बालक जागीच ठार झाला, तर उषा चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक सचिन साळुंखे यांच्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत बालकाचे आजोबा धनु चव्हाण यांनी फिर्याद दिली.
- मजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटून चिमुरड्याचा मृत्यू
- सोलापुरात ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने अपघात
- सात जण गंभीर जखमी झाले आहेत
- ट्रॅक्टरचालक सचिन साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा
- मृत बालकाचे आजोबा धनु चव्हाण यांची फिर्याद
The tractor’s trolley overturned one month Child died
महत्त्वाच्या बातम्या
- परमवीर सिंग यांना अटक करणारच; पण ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात; ठाकरे सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- मनी लाँडरिंग : जॅकलिन फर्नांडिस ईडी कार्यालयात पोहोचली , एजन्सीला पुन्हा विवरण नोंदवायचे आहे
- HISTORY CREATED : अबकी बार १०० करोड पार ! लसीकरणाचा उच्चांक! भारत लसीकरणात अव्वल १०० कोटी डोसने रचला इतिहास
- माजी गृहमंत्री, पोलिस आयुक्तांचे हनीमून कोठे सुरु ?, अमृता फडणवीस यांचा सवाल; सरकारवर हल्लाबोल