प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या निकालाचा महाविकास आघाडीला आणि विशेषतः शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. भाजप ईडीसारख्या यंत्रणांचा कसा वापर करत आहे हे सांगताना राऊत यांनी भाजपवर टीका केली, त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना मी जोकर म्हणणार नाही. पण ते जोकरसारखी विधाने नेहमीच करत असतात, असा टोला फडणवीस यांनी लगावला. The tissues are not called jokers, but they always make joker-like statements
Somaiya – Raut : किरीट सोमय्या – संजय राऊतांच्या पुन्हा एकमेकांवर तोफा!!
आमच्याकडे देखील यंत्रणा आहेत फक्त ईडी आमच्याकडे नाही. जर फक्त 48 तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली, तर भाजपसुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. या विधानाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. अशी जोकरसारखी विधानं ही संजय राऊत रोजंच करत असतात. मी त्यांना जोकर म्हणत नाहीये, त्यांच्या पण रोजच्या विधानांना रोज काय उत्तर द्यायचे?, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील
विधान परिषदेच्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उभे आहेत. महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपाच्या पाच उमेदवारांमध्ये ही लढाई रंगणार आहे. याचबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आपले पाचही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत अंतर्गत कलह खूप आहे, त्यामुळे आमचे सर्व उमेदवार निवडून आणण्यात आम्हाला नक्कीच यश येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
The tissues are not called jokers, but they always make joker-like statements
विशेष प्रतिनिधी
- नॅशनल हेराल्ड केस : राहुल गांधी यांची ED चौकशी सुरू; काँग्रेसचे जोरदार “ED बुस्टर डोस शक्तीप्रदर्शन”!!
- Presidential Polls : राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप विरोधी पक्षांशी बोलणार, नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी
- नुपुर शर्मा : प्रवासी भारतीय आणि पाकिस्तानी निदर्शकांना कुवेत देशाबाहेर काढणार!!
- शक्ती कपूर : बंगळुरात रेव्ह पार्टीतून सिद्धांत कपूर पोलीसांच्या ताब्यात; चाचणी ड्रग्ज पॉझिटीव्ह, पण शक्ती कपूर मुलाच्या बचावात पुढे!!