• Download App
    शरद पवार बोले, ठाकरे सरकार हले, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे मात्र मलिद्यासाठी ओले-ओले|The Thackeray government obstructed the river development project

    शरद पवार बोले, ठाकरे सरकार हले, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे मात्र मलिद्यासाठी ओले-ओले

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील महत्वाकांक्षी नदी सुधार योजनेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला होता. त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या या योजनेत ठाकरे सरकारने अडथळा आणला आहे. मात्र, राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी मलिद्यासाठी या योजनेला महापालिकेत पाठिंबा दिला होता.Thet Thackeraygovernment obstructed the river development project

    राज्य सरकारकडून या प्रकल्पावर असणाऱ्या आक्षेपांबाबत एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नदीकाठ सुधार योजनेवरील आक्षेप, योजनेतील कामे, परिणाम या बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार आहे. यासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पर्यावरण खात्यातील सचिवांची समिती नेमण्यात येणार आहे.



    या समितीद्वारे येत्या आठ ते दहा दिवसात अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे शरद पवारांशी चर्चा करणार आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. भाजपची पुणे मनपात सत्ता असल्याने ठाकरे सरकाकडून भाजपला मोठा धक्का देण्यात आला आहे.

    विशेष म्हणजे या योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर त्यांच्याच इशाऱ्यावर काम करणाºया नगरसेवकांनी या योजनेला पाठिंबा दिला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकतेच नदीसुधार योजनेचे भूमिपूजन झाले होते.

    त्याच्या आदल्या दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन योजनेच्या व्यवहारर्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की मी इंजिनिअर नाही. परंतु, पुण्याच्या वरती पाच धरणे आहेत. मोठा पाऊस पडून जर पाणी सोडण्याची वेळ आली तर मोठा महापूर येऊ शकतो. त्यावेळी नदी सुधार योजनेचे काय होईल?

    The Thackeray government obstructed the river development project

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य