• Download App
    ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पाच दिवस खुला राहणार ; पावसाळी नियमांमुळे ४ महिने पुन्हा बंद। The Tadoba Tiger Project will be open for five days from today; Closed again for 4 months due to rainy season

    ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पाच दिवस खुला राहणार ; पावसाळी नियमांमुळे ४ महिने पुन्हा बंद

    वृत्तसंस्था

    चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून ५ दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. १५ एप्रिल २०२१ पासून कोरोना दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रकल्प बंद होता. The Tadoba Tiger Project will be open for five days from today; Closed again for 4 months due to rainy season

    ४ जूनच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरांच्या विविध लेव्हल नुसार सामाजिक- पर्यटन कार्यक्रम राबविण्यासाठी परवानगी दिली होती. त्यात १३ कोरोना बाधीत आढळल्यावर शहर श्रेणी १ मध्ये समाविष्ट झाले. या दिलासादायक वार्तेनंतर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे ३०जून पर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली.



    प्रकल्पाच्या विविध ६ प्रवेशद्वारावरून दिवसाच्या २ टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली आहे. ऑनलाईन बुकिंग प्रणाली सुरु नाही. त्यामुळे थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करावे लागणार आहे. आज पहिल्याच दिवशीच्या पहिल्या सत्रात ४ जिप्सीतून पर्यटक ताडोबात पोचले.

    पावसाळी नियमाप्रमाणे ताडोबा कोअर क्षेत्र ४ महिने १ जुलैपासून बंद राहणार आहे. ताडोबातील पर्यटन सुरू करण्यासाठी रिसॉर्ट-हॉटेल व्यावसायिक-जिप्सी ऑपरेटर यांचा व्यवस्थापन आणि सरकारवर मोठा दबाव होता. मात्र बफर क्षेत्रातील सफारी सुरू करण्यासाठी विशिष्ट नियमांसह स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत. आजच्या निर्णयामुळे ताडोबातील ठप्प झालेले अर्थचक्र सुरू होण्यास मदत मिळणार आहे.

    The Tadoba Tiger Project will be open for five days from today; Closed again for 4 months due to rainy season

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !