विशेष प्रतिनिधी
मुंबई : मध्य प्रदेशच्या यशस्वी योजनेची महाराष्ट्रात कॉपी, झाली बहीण लाडकी!! उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना जाहीर केली. त्याचबरोबर पात्र कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडरची ही घोषणा केली यामुळे अजित पवारांनी अर्थसंकल्पातून महायुतीच्या मतांसाठी पेरणी केली. The successful scheme of Madhya Pradesh has been copied in Maharashtra
राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. आहेत. यावेळी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
सामूहिक विवाह अनुदानात वाढ
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान १० हजार होते ते आता २५ हजार केलं आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात ७८ हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ. हर घर नल, हर घर जलसाठी १ कोटी २५ लाख ६६ लाख घरांना नळजोडणी दिली आहे. राहिलेल्या घरांचे काम प्रगतीपथावर आहे, असंही अजित पवार म्हणाले.
महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या. घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजना
स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबणासाठी २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दर महा १५०० रुपये देणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी देण्यात येईल. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असं म्हणत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे.
मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली योजना जाहीर केली होती. त्या योजनेतून ते मध्य प्रदेशातल्या प्रत्येक महिलेला विशेष अनुदान देत होते. ही योजना मध्य प्रदेशात अजूनही चालू आहे. तीच योजना वेगळ्या नावाने शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रात लागू केली आहे.
The successful scheme of Madhya Pradesh has been copied in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- ICC T20 World Cup : इंग्लडला 68 धावांनी पराभूत करत भारताची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक!
- पेपरफुटी वरून विरोधकांचा दोन्ही सरकारांवर हल्लाबोल, पण महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या काळात झाल्या तरी किती पेपरफुटी??
- गुंडांशी संबंध नकोत, म्हणून अजितदादांनी भरली होती तंबी, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ती खुंटीला टांगली!!
- केजरीवाल सरकारला आणखी एक मोठा झटका, उपराज्यपालांनी ‘ही’ समिती केली बरखास्त