यशोमती ठाकूर यांनी कुठलाही विचार न करता विद्यार्थ्यांची विचारपूस करत चक्क आपल्या गाडीमध्ये विद्यार्थ्यांना बसवून त्यांना फत्तेपुरला सोडले.The students traveled in the Guardian Minister’s car to reach the school
विशेष प्रतिनिधी
अमरावती : एस टी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. आता काही एसटी कर्मचारी कामावर रूजू देखील होत आहेत. मात्र, एखाद्या डेपोमधून २ किंवा ३ सुटत आहेत.दरम्यान आता राज्यामध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यासाठी सर्रास एसटी बसचा वापर करतात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना ८-१० किलो मीटर पायी प्रवास करून शाळेत जावे लागत आहे.
- किरीट सोमय्या यांनी येऊन जिल्हा भडकवण्याचं काम अजिबात करू नये ; जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर
दरम्यान अमरावती जिल्हामध्ये आज विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यासाठी एसटीची वाट पाहात रस्त्यावर उभे होते. त्याचवेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावती नागपूर मार्गावरून तीवसाकडे चालल्या होत्या.यावेळी त्यांनी पाहिले कीकाही विद्यार्थी बसची वाट पाहात आहेत.
यावेळी यशोमती ठाकूर यांनी कुठलाही विचार न करता विद्यार्थ्यांची विचारपूस करत चक्क आपल्या गाडीमध्ये विद्यार्थ्यांना बसवून त्यांना फत्तेपुरला सोडले. या विद्यार्थ्यांच्या प्रवासासोबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करा,मोठे अधिकारी व्हा अस म्हणतं विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. यावेळी विद्यार्थ्यांना यशोमती ठाकूर यांनी चॉकलेट देखील दिले.