• Download App
    सलग बारा तास अभ्यास करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थ्यांचे अभिवादन.. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला अभ्यास.|The Student's Give Tribute To Doctor Babasaheb Ambedkar, Studying 12 Hours Continuously..

    सलग बारा तास अभ्यास करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थ्यांचे अभिवादन..

    • स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला अभ्यास.

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्यावतीने सलग १२ तास अभ्यास करून विद्यार्थ्यांनी, महामानवास अभिवादन केलं. राज्य शासनाचे मंडालाधिकारी शंकर ठुबे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.The Student’s Give Tribute To Doctor Babasaheb Ambedkar, Studying 12 Hours Continuously..

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खर्‍या अर्थाने रुजवण्याचा व त्यांचा मूलमंत्र शिका, संघटित व्हा, संघर्ष करा शासनकर्ते व्हा. हा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या वतीने व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने होत असल्याचे प्रतिपादन महावितरणचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले.



    याप्रसंगी ग्रीन सोल्युशन कंपनी प्रा. लिमिटेडचे प्रमुख सागर आईवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पीएसआय अक्षय गोरड, पीएसआय धनवडे, एमएसईबीचे अनिरुद्ध कुलकर्णी, यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

    उपक्रमामध्ये ताडीवाला रोड विभागातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील एमपीएससी, यूपीएससीचा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी सलग बारा तास अभ्यास केला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय विभागाचे निरीक्षक श्रीकांत संगेपाग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन ग्रंथालयाचे सचिव सुजित यादव यांनी केले.

    The Student’s Give Tribute To Doctor Babasaheb Ambedkar, Studying 12 Hours Continuously..

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा