• Download App
    सिल्व्हर ओक" वरील दगड - चप्पल फेकीची होती विश्वास नांगरे पाटलांना पूर्वकल्पना|The stone on "Silver Oak" - the slippers were thrown. - Disclosure of information from the letter of the special branch of the police

    “सिल्व्हर ओक” वरील दगड – चप्पल फेकीची होती विश्वास नांगरे पाटलांना पूर्वकल्पना!! – पोलिसांच्या विशेष शाखेच्या पत्रातून माहिती उघड

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “सिल्व्हर ओक” या निवासस्थानावर संतप्त एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. या संदर्भातली माहिती विश्वास नांगरे पाटील यांना होती, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या विशेष शाखेच्या पत्रातून उघड झाली आहे. तरी देखील हा हल्ला पोलिसांनी का रोखला नाही?, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.The stone on “Silver Oak” – the slippers were thrown. – Disclosure of information from the letter of the special branch of the police

    माध्यमातून समोर आलेल्या बातम्यांनुसार, “सिल्व्हर ओक” या पवारांच्या निवासस्थानी एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी दगड आणि चप्पल फेक केली होती, याची माहिती माध्यमांना होती तर मग पोलिसांना कशी या आंदोलनाची माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे विरोधकांनी पोलिसांना या हल्ल्यांची माहिती का मिळाली नाही?, असा सवाल देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला होता. या प्रकारानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चांगलेच अडचणीत आले होते. मात्र आता हे पोलिसांचे पत्रच बाहेर आल्याने सिल्वर ओक कर पहिल्यांदा पोचणारे वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील हेच अडचणीत आले आहेत.



    काय म्हटले आहे पत्रात?

    एसटी कर्मचारी अधिक आक्रमक होऊन आंदोलन करणार असल्याचे या पत्रात म्हटले असून हे पत्र दिनांक 4 एप्रिल रोजीचे आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 10 नोव्हेंबर 2021 पासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.

    आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात 10 नोव्हेंबर 2021 ते 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.

    त्या नंतर इतर नेत्यांच्या मार्गदर्शनात आंदोलन सुरू आहे. 5 एप्रिल 2022 रोजी न्यायालयाचा निकाल येणार असल्याने 1500 ते 1600 तरुण येऊन जाऊन आहेत. आंदोलनस्थळी आंदोलकांची संख्या वाढत आहे. विलीनीकरणाचा निर्णय आपल्या विरोधात जाण्याची जाणीव त्यांना झाली आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    The stone on “Silver Oak” – the slippers were thrown. – Disclosure of information from the letter of the special branch of the police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस