• Download App
    एसटी बसेसचे स्टेअरिंग होमगार्डच्या हाती, राज्यभरात चार हजार जवान तयार ; जवानांकडे आहे अवजड वाहन चालवण्याचा परवाना । The steering of ST buses is in the hands of Home Guard, 4,000 personnel are ready across the state; Soldiers have a license to drive heavy vehicles

    एसटी बसेसचे स्टेअरिंग होमगार्डच्या हाती, राज्यभरात चार हजार जवान तयार ; जवानांकडे आहे अवजड वाहन चालवण्याचा परवाना

    देशात, राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर होमगार्ड सैनिकांची त्याजागी नेमणूक करावी, अशी तरतूद राज्याच्या होमगार्ड अधिनियमात आहे. The steering of ST buses is in the hands of Home Guard, 4,000 personnel are ready across the state; Soldiers have a license to drive heavy vehicles


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : एसटी महामंडळाचे विलीनीकरण व पगारवाढ करावी या मागण्यांसाठी परीवहन महामंडळाचे चालक व वाहक संप करत आहेत. दरम्यान अद्याप हा संप मिटला नसून संप मिटेपर्यंत व राज्य शासनाला मदत करण्याकरता गृहरक्षक दल (होम गार्ड) तयार आहे. देशात, राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर होमगार्ड सैनिकांची त्याजागी नेमणूक करावी, अशी तरतूद राज्याच्या होमगार्ड अधिनियमात आहे.

    राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपात असल्याने थांबलेली प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी एसटी बसेसचे स्टेअरिंग होमगार्डच्या हाती द्या, त्यासाठी राज्यभरात चार हजार जवान तयार आहेत, अशी मागणी होमगार्ड विकास समिती परिवहन मंत्र्यांकडे करणार आहे.



    राज्याच्या गृह रक्षक दलाच्या महासमादेशकांनी आदेश काढले तर राज्यातील चार हजार होमगार्ड जवान लालपरी चालवण्यास तयार आहेत.या जवानांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवानादेखील आहे. त्यामुळे आम्ही कर्तव्य समजून राज्य शासनाला मदत व्हावी म्हणूण बसेस चालवायला तयार आहोत. त्यासाठी शासनाने आदेश काढावा, याची आम्ही वाट पाहत आहोत असा होमगार्ड संघटनेने दावा केला आहे.

    The steering of ST buses is in the hands of Home Guard, 4,000 personnel are ready across the state; Soldiers have a license to drive heavy vehicles

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा