• Download App
    राज्याचं हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबरला मुंबईतच होणार The state's winter session will be held in Mumbai from December 22 to 28

    राज्याचं हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबरला मुंबईतच होणार

     

    विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश नाही.यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे.The state’s winter session will be held in Mumbai from December 22 to 28


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने दिली आहे. हे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन येत्या २२ ते २८ डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन असून, सोमवारी संसदीय कामकाज समितीची बैठक होणार असून या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जातंय.

    विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश नाही.यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसंच राज्यातून कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही, हा सगळा विचार करता महाविकास आघाडी सरकारला हे अधिवेशन मुंबईत हवं आहे.

    त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आलेय. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.तसेच दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल.

    The state’s winter session will be held in Mumbai from December 22 to 28

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस