प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांसोबतचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करून झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी काहीही बोलण्यास नकार दिला, पण त्यावर शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट उठण्यासंदर्भात वक्तव्य केल्याने या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली. The statement that the President’s rule has been removed was funny
पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजेन वाले को इशारा काफी है,’ असे सूचक विधान शरद पवारांनी केले होते.
या वक्तव्याच्या दोनच दिवसांनंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. ‘राष्ट्रपती राजवट हटली त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हे मी मजेत बोललो होतो. देवेंद्र फडणवीसांनी माहिती द्यावी, त्याला मी इतके महत्त्व देत नाही. शरद पवारांच्या बोलण्यामुळे राष्ट्रपती राजवट लागते, इतके माझे महत्त्व आहे, चांगलं आहे,’ असा दावाही शरद पवारांनी केला.
फडणवीसांचा गुगली
शरद पवारांनी राष्ट्रपती राजवटीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही गुगली टाकला होता. ‘त्यांनी खुलासा केला ते चांगलं आहे. आता माझी त्यांच्याकडून अजून अपेक्षा आहे. राष्ट्रपती राजवट का लागली? कुणाच्या सांगण्यावरून लागली? त्याच्या पाठीमागे काय होतं? यासंदर्भातला खुलासा त्यांनी केला, तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतील, त्यामुळे यासंदर्भातलं उत्तरही त्यांच्याकडून यावं, अशी माझी अपेक्षा आहे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर पवारांनी राष्ट्रपती राजवट हटल्याचे वक्तव्य मजेत केले होते, असे वक्तव्य केले.
The statement that the President’s rule has been removed was funny
महत्वाच्या बातम्या