वृत्तसंस्था
पुणे : राज्यात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. थंडी कमी झाली असून शिवरात्रीनंतर तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गॉगल, टोपी, स्कार्फ याचा वापर करण्याची गरज आहे. The state is feeling the heat; There will be severe summer after Shivratri
कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे राज्यात दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ कायम असून, उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. रात्रीचे किमान तापमानही सर्वत्र सरासरीच्या पुढे गेल्याने रात्री हवेतील गारवा घटला आहे.
तापमानातील ही वाढ पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात गेल्या आठवड्यापासून दिवसाचे किमान आणि रात्रीच्या कमाल तापमानात वाढ दिसून येत आहे. बहुतांश भागात दिवसा आकाश निरभ्र राहत असल्याने उन्हाचा चटका जाणवतो आहे.
तापमानाचा पारा वाढला
विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा आदी भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी वाढल्याने दिवसा उकाडा जाणवतो आहे. कोकण विभागातील मुंबई परिसरात कमाल तापमानाचा पारा सरासरीजवळ असला, तरी रत्नागिरीसह कोकणात कमाल तापमानात वाढ झाली आहे. अकोला येथे गुरुवारी राज्यातील उच्चांकी ३६.९ तापमानाची नोंद झाली.
The state is feeling the heat; There will be severe summer after Shivratri
महत्त्वाच्या बातम्या
- युद्धविरोधी निदर्शनांमध्ये १७०० हून अधिक लोक ताब्यात रशियातही दडपशाही सुरू; अमेरिकेचा पुन्हा इशारा
- बिहारमध्ये झोपडीतील बॉम्बस्फोटात 14 जण जखमी कचऱ्यात सापडलेल्या बाॅक्स मध्ये होते छोटे बाॅम्ब
- रशियावर इतिहासातील सर्वात कडक आर्थिक निर्बंध, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची घोषणा
- हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, पावसामुळे जनजीवन ठप्प अनेक गावांचा संपर्क तुटला