येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.The state is expected to receive torrential rains with gusty winds for the next four days, the meteorological department warned
विशेष प्रतिनिधी
मुंबई : या आठवड्यात मोसमी पाऊस राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.यामध्ये कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान परतीचे वेध लागलेल्या मान्सूनने सोमवारी रात्री पुणे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या एक ते दोन तासांमध्ये पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणीपाणी झाले होते.
पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत.काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.
The state is expected to receive torrential rains with gusty winds for the next four days, the meteorological department warned
महत्त्वाच्या बातम्या
- नोबेल पुरस्कार २०२१ जाहीर! सिक्युरी मनाबे, क्लॉस हेसलमेन आणि जियोर्जिओ पारिसी यांना फिजिक्समधील नोबेल पुरस्कार
- अंतराळात रशिया रचणार विक्रम, अवकाशात पहिल्यांदा करणार चित्रपटाचे शूटिंग, अभिनेत्रीसह संपूर्ण टीम अवकाशयानातून जाणार
- Drugs Case : शर्लिन चोप्राचे शाहरुख खानवर गंभीर आरोप, म्हणाली- बॉलीवूड स्टार्सच्या बायका त्यांच्या पार्ट्यांमध्ये ‘व्हाइट पावडर’ घ्यायच्या
- दोन महिन्यानंतर कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्त ठिकानांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल! स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांत झटापट