केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहेThe state government is working to strangle democracy – Prasad Lad
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज करून नॉट रिचेबल असेलले नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.
नारायण राणे यांना काल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता की, नितेश राणे सध्या कोठे आहेत?.यावर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी सवाल केला आहे.प्रसाद लाड म्हणाले की , आमदार नितेश राणे कुठे आहेत ? हे शोधणे पोलिस यंत्रणेचे काम आहे. मग त्यांच्या चौकशीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस का ? असा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला आहे.
दरम्यान श्री.राणे यांच्यावर होत असलेली कारवाई सूडबुद्धीची असून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. केंद्रीय मंत्री राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर श्री. लाड यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
The state government is working to strangle democracy – Prasad Lad
महत्त्वाच्या बातम्या
- जे पी नड्डा यांच्या प्रचारसभेनंतर महिलांनी फाडले होर्डिंग्स ; म्हणाल्या – घरात चूल पेटवण्यासाठी कामाला येतील
- PM Kisan : नवीन वर्षात पंतप्रधान मोदी देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 20 हजार कोटी रुपये
- पीएम मोदींच्या सभेदरम्यान कारची तोडफोड करणाऱ्या पाच नेत्यांची समाजवादी पक्षाने केली हकालपट्टी, दंगल भडकावण्याचा आरोप
- ३१ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लागू; पार्ट्यांना बंदी ; मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती