• Download App
    राज्य सरकार रोज नवीन काहीतरी पुड्या सोडत ; खासगीकर करणार या राज्य सरकारच्या अफवा : गोपीचंद पडळकर । The state government is releasing something new every day; Rumors of this state government to be privatized: Gopichand Padalkar

    राज्य सरकार रोज नवीन काहीतरी पुड्या सोडत ; खासगीकर करणार या राज्य सरकारच्या अफवा : गोपीचंद पडळकर

    राज्य सरकारी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे.विलीनीकरण चे लेखी पत्र द्यायला पाहिजे. अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारकडे केली. The state government is releasing something new every day; Rumors of this state government to be privatized: Gopichand Padalkar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. राज्य सरकार रोज नवीन काहीतरी पुड्या सोडतो आहे.खासगीकर करणार या राज्य सरकारच्या अफवा आहेत .असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

    ‘एसटीचे विलीनीकरणाचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकार रोज टोलवाटोलवीची काम करत आहे. राज्य सरकार दररोज नव-नवीन स्टेटमेंट देत आहेत. संप मोडीत काढायचा प्रयत्न सुरू आहे.अनिल परब हतबल झालेत त्यामुळे ते काहीही बोलतात,’ असा आरोप पडळकरांनी केला आहे.राज्य सरकारी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे.विलीनीकरण चे लेखी पत्र द्यायला पाहिजे. अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारकडे केली.



    पुढे पडळकर म्हणाले की , जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण होत नाही तोपर्यंत भाजप एसटी कर्मचाऱ्यांना धान्य पुरवणार.भाजप हा तळागळातला पक्ष आहे.तसेच आमची नाळ ही सगळ्याशी जोडली आहे .

    पवारांनी आजवर मान्यताप्राप्त संघटनेला हाताशी धरुन कर्मचाऱ्यांवर अन्याय केला. पण आता कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली आहे. त्यामुळे जर विलिनीकरणचा हा प्रश्न मिटला तर पवारांच्या संघटनेचं दुकान बंद होईल. त्यामुळे निर्णय घ्यायला अडचण होत आहे”, अशी जोरदार टीका गोपीचंद पडळकरांनी केली.

    The state government is releasing something new every day; Rumors of this state government to be privatized: Gopichand Padalkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस