• Download App
    ...म्हणून राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत केली दहा पट वाढ - मुख्यमंत्री शिंदे The state government has increased the award amount of sportspersons by ten times Chief Minister Shinde

    …म्हणून राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत केली दहा पट वाढ – मुख्यमंत्री शिंदे

    राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटनाप्रसंगी मिशन ऑलिम्पिकचीही केली घोषणा.

    विशेष प्रतिनिधी

    चंद्रपूर : बल्लारपूर क्रीडा संकूल येथे आयोजित करण्यात आलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. संपूर्ण देशभरातून या स्पर्धेसाठी जवळपास १५५१ खेळाडू सहभागी झाले होते. The state government has increased the award amount of sportspersons by ten times Chief Minister Shinde

    या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार रामदास आंबटकर, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चावरे, जिल्ह्याधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासह पद्मश्री पुरस्कार विजेते बहाद्दुरसिंह चव्हाण, धावपटु हिमा दास, ललिता बाबर, बैडमिंटन पटू मालविका बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सुरुवात देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंनी शिस्तबध्द पध्दतीने फ्लॅगमार्च करत त्यातून आपापल्या राज्याचे दर्शन घडविले. तसेच यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसाची माहिती व्हावी, या उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिकेचे विमोचनही यावेळी पार पडले.

    यावेळी बोलताना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ११ सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्राधान्य दिले असून याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहा पटीने वाढ केली असल्याचे नमूद केले.

    खेलो इंडिया, फिट इंडिया, उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, २०३६ मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी मोदींचा जोरकसपणे पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे एक प्रकारे आव्हानात्मक कार्य असून चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांची प्रशासकीय चमू ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले. तसेच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जाहीर झाल्याची घोषणा करताना मिशन ऑलिम्पिकचीही यावेळी घोषणा केली.

    The state government has increased the award amount of sportspersons by ten times Chief Minister Shinde

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!