• Download App
    राष्ट्रवादीतील फुटीने विरोधी ऐक्याच्या भीष्म पितामहांचे राजकीय महत्त्व घटले; पवारांनी बंगलोरच्या बैठकीला जाणे टाळले!!|The split in the Nationalist Party reduced the political importance of Bhishma Pitamaha of the Opposition Unity; Pawar avoids going to Bangalore meeting!!

    राष्ट्रवादीतील फुटीने विरोधी ऐक्याच्या भीष्म पितामहांचे राजकीय महत्त्व घटले; पवारांनी बंगलोरच्या बैठकीला जाणे टाळले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पडली. त्यामुळे विरोधी ऐक्याचे भीष्म पितामह मानले गेलेल्या शरद पवारांचे राजकीय महत्त्व घटले. त्यामुळे स्वतः पवारच बेंगलोरच्या बैठकीपासून दूर झाले आहेत. विरोधी ऐक्याच्या आजपासून सुरू होणाऱ्या बैठकीला शरद पवारांनी दांडी मारली आहे. आपला बेंगलोर दौरा अचानक रद्द करून पवार मुंबईतच थांबणार आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन सुरू होत असताना ते आज शरदनिष्ठ आमदारांच्या भेटी घेणार आहेत.The split in the Nationalist Party reduced the political importance of Bhishma Pitamaha of the Opposition Unity; Pawar avoids going to Bangalore meeting!!

    महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी निष्ठावर असलेला आमदारांच्या भेटीसाठी घेण्यासाठी पवार मुंबईत थांबणार असल्याचा खुलासा जरी त्यांच्या गटाने केला असला तरी प्रत्यक्षात विरोधी ऐक्यातले शरद पवारांचे राजकीय महत्त्व आता घटले आहे. यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये पवारांना सर्वात ज्येष्ठतेचा मान देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका झाल्या होत्या. नवी दिल्ली आणि पाटण्यामध्ये पवार विरोधी ऐक्याच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. पण त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती. त्यामुळे विरोधी ऐक्याच्या बैठकीत भीष्मपितामह म्हणून भूमिका बजावणी पवारांना शक्य होते.



    विरोधकांमध्ये प्रतिमा बदलली

    आता देखील पवारांचा वयानुसार ज्येष्ठतेचा मान कमी झालेला नाही. पण राष्ट्रवादीत फूट पडल्याने विरोधी ऐक्य असल्याचे राजकीय महत्त्व मात्र पुरते घटले आहे. 20 – 25 विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम करणारा नेता आपला स्वतःचाच पक्ष टिकवू शकत नाही. एकसंध राखू शकत नाही, अशी सर्व विरोधकांमध्ये पवारांची प्रतिमा बनली आहे.

     पवारांविषयी सोनियांच्या मनात संशय

    त्याचबरोबर पवारांच्या एकूण राजकीय भूमिकेविषयी सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी नेत्यांच्या मनात संशय तयार झाला आहे. एकीकडे अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून द्यायचे आणि दुसरीकडे आपण प्रमुख नेता म्हणून विरोधी ऐक्यात सामील व्हायचे हा पवारांचा डाव असल्याचा संशय सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्यांसह बाकीच्या विरोधकांनाही आला आहे.

    या पार्श्वभूमीवर विरोधी ऐक्याच्या बैठकीत आपल्या भोवतीचे संशयाचे पडळ घट्ट झालेले बघून पवारांनी बंगलोरला जाण्याचे टाळण्याचे दिसून येत आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच भाजप सत्तेवर येणार आहे हे शरद पवारांनीच आम्हाला सांगितल्याचे अजित पवार वारंवार सांगतात. त्यामुळे देखील पवारांभोवतीचा संशय गडद झाला आहे.

    या पार्श्वभूमीवर विरोधी नेत्यांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणारे शरसंधान टाळण्यासाठी पवारांनी बंगलोरच्या बैठकीला जाण्याचे टाळले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    The split in the Nationalist Party reduced the political importance of Bhishma Pitamaha of the Opposition Unity; Pawar avoids going to Bangalore meeting!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस