विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचे वाघनखांनी कोथळे काढले, पण तीच वाघनखं लंडन मधल्या म्युझियम मधून महाराष्ट्रात येणार हे पाहून आपलेच नेते एकमेकांना बोचकारे काढत आहेत. The shivaji maharajs tiger nail will come to Maharashtra from the museum in London
लंडन मधल्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमशी करार करून महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षांसाठी महाराष्ट्रात आणणार आहे. मात्र या मुद्द्याचे राजकीय मायलेज शिंदे – फडणवीस सरकारला मिळू नये म्हणून राजकीय व्यूहरचना करीत इतिहासकार इंग्रजीत सावंत मार्फत ती वाघनखं शिवाजी महाराजांची नसल्याचा शोध समोर आणण्यात आला आहे आणि त्यातून महाराष्ट्रातल्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत.
जी वाघनखं खरी नाहीत ती महाराष्ट्रात आणायचीच कशाला??, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला, तर इंद्रजित सावंत महाराष्ट्राचे माहितगार इतिहासकार आहेत. त्यांनी वाघनखांसंदर्भात काही खुलासे केले असले, तरी आपल्याला त्याची काही माहिती नाही. त्यामुळे आपण काही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असे शरद पवारांनी जुन्नर मध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे इंग्लडमधून मायभूमीत परतणार!!
संजय राऊत यांनी त्यावर वरकडी करत शिवसेना हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं असल्याची मखलाशी केली. लंडनहून वाघनखं येत आहेत, याचा आम्हाला आनंदच आहे, पण शिवाजी महाराजांची खरी वाघनखं शिवसेना आहे. कारण शिवसेनेने गेल्या 50 – 55 वर्षात महाराष्ट्रावर झालेल्या आक्रमणांचा कोथळा बाहेर काढला आहे, पण भाजपने महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करून ती वाघनखं बोथट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. या सर्वांवर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ती वाघनखं खरी नसल्याचे सिद्ध करा, असे आव्हान आदित्य ठाकरेंसह सर्व विरोधकांना दिले.
स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचे कोथळे शिवाजी महाराजांनी त्या वाघनखांनी काढले, पण आज त्याच वाघनखांवरून महाराष्ट्रातले नेते एकमेकांना बोचकारे काढताना दिसत आहेत.
The shivaji maharajs tiger nail will come to Maharashtra from the museum in London
महत्वाच्या बातम्या
- विरोधकांच्या मुद्द्यांचे जुने टेक्श्चर; 2023 – 24 मध्ये जनतेला पाजणार 1971 आणि 1989 – 90 चे फॅमिली मिक्श्चर!!
- नाशिक मध्ये आज गोदाप्रेमींचे एकत्रीकरण आणि सन्मान सोहळा; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा उपक्रम
- Asian Games 2023 : हॉकीमध्ये भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक अन् दणदणीत विजय
- ”आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे निपजल्याचे बघून बाळासाहेबांना खूप दुःख झाले असेल”