• Download App
    शिवसेनेचा माझी हत्या करण्याचा हेतू होता; किरीट सोमय्यांनी शेअर केला व्हिडीओThe Shiv Sena intended to assassinate me; Video shared by Kirit Somaiya

    शिवसेनेचा माझी हत्या करण्याचा हेतू होता; किरीट सोमय्यांनी शेअर केला व्हिडीओ

    पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर द्यावं असं म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरला हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला असून आपल्या हत्येचा कट होता असा आरोप केला आहे.The Shiv Sena intended to assassinate me; Video shared by Kirit Somaiya


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर द्यावं असं म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरला हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला असून आपल्या हत्येचा कट होता असा आरोप केला आहे.

    किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत त्यांच्या गाडीमागे शिवसैनिक धावत असल्याचं दिसत आहे. यावेळी एका व्यक्तीच्या हातात मोठा दगड होता. हा व्हिडीओ शेअर करताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, ५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालयात मला मारण्याचा शिवसेनेचा हेतू होता.

    सोमय्या शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी जम्बो करोना रुग्णालयात घोटाळा झाल्याची तक्रार दिली. तिथून ते महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते, याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच सुमारे १०० शिवसैनिक महापालिका आवारात दाखल झाले.

    सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवले, ‘तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही, निवडक प्रकरणावर का चर्चा करता,’ असा जाब त्यांनी विचारला. त्यावर सोमय्या यांनी ‘मला माहिती द्या, मी त्याबद्दलही प्रशासनाशी बोलतो’, असे सांगितले.

    The Shiv Sena intended to assassinate me; Video shared by Kirit Somaiya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !