विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरीर संबंधासाठी मुलींची मागणी करणाऱ्या एका शिवसैनिकाला महिला रिक्षाचालकाने चांगलेच धुतले. भर रस्त्यात चपलेने मारल्यानंतर पक्षातून या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आली.विरारमध्य हा प्रकार घडला. महिला रिक्षाचालकाने भररस्त्यात या शिवसैनिकाला चपलेने चोपले आहे.The Shiv Sainik beated by a female rickshaw puller, who had demanded girls for sexual intercourse
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर विरार पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या संशयित आरोपी फरार आहे.
पीडित महिला विरारमध्ये राहते. त्याने या महिलेला फोन कॉल केला. तसेच शरीर संबंधासाठी मुली पाठवण्याची मागणी केली. ही मागणी ऐकताच संतापलेल्या रिक्षा चालकाने भररस्त्यात या शिवसैनिकाला चोप दिला.
या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आरोपीने काही काळानंतर घटनास्थळावरुन फरार झाल्यानंतर महिला रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
The Shiv Sainik beated by a female rickshaw puller, who had demanded girls for sexual intercourse
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर नथुराम गोडसेची भूमिका केल्याचा खासदार अमोल कोल्हेंना झाला पश्चाताप, आळंदीत घेतला आत्मक्लेश करून
- कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खोटे बोलणाऱ्या अखिलेश यादव यांना लाज वाटली पाहिजे, अमित शहा यांची टीका
- लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याची चौकशी पूर्ण, १५ फेब्रुवारी रोजी लागणार निकाल
- राहूल गांधींविरोधातील खटल्याची होणार जलदगती सुनावणी, भिवंडी न्यायलयात हजर राहावे लागण्याचीशक्यता