• Download App
    शाळेची घंटा वाजणार मात्र, विद्यार्थ्यांवर हजेरीचे बंधन नाही, ऑनलाईन शिक्षण सुरू राहील; वर्षा गायकवाड यांचा खुलासा|The school bell will ring, however, students are not required to attend, online education will continue; Revealed by Varsha Gaikwad

    शाळेची घंटा वाजणार मात्र, विद्यार्थ्यांवर हजेरीचे बंधन नाही, ऑनलाईन शिक्षण सुरू राहील; वर्षा गायकवाड यांचा खुलासा

    प्रतिनिधी

    मुंबई – ठाकरे – पवार सरकारने महाराष्ट्रातल्या शाळा सुरू करायचा निर्णय घेतला हे बरोबर आहे. पण त्यामध्ये काही अटी – शर्तीही आहेत. शाळेत हजेरी लावण्याची पालकांची संमती हवी. विद्यार्थ्यांवर हजेरी बंधनकारक नाही. त्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद होणार नाही. या त्या अटी – शर्ती आहेत. हा खुलासा काँग्रेसच्या नेत्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे.The school bell will ring, however, students are not required to attend, online education will continue; Revealed by Varsha Gaikwad

    कोविड नियमांचे पालन करतच 4 ऑक्टोबर २०२१ पासून राज्यात शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. याआधीही ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यावेळी त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.



    पण आता कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे आणि बहुतांशी भागांतील शिक्षक – शालेय कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण झा आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शाळांमधील घंटानाद ऐकायला मिळणार आहे.

    • शाळेत येण्याची कुठल्याही विद्यार्थ्यावर सक्ती नसून, पालकांची संमती आवश्यक असणार आहे.
    • कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व शाळांवर बंधनकारक असणार आहे.
    • जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकत नाही त्यांचे शिक्षण बंद न राहता ऑनलाईन शाळा सुरू राहतील.

    The school bell will ring, however, students are not required to attend, online education will continue; Revealed by Varsha Gaikwad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ