• Download App
    मराठा आरक्षणावर आघाडी सरकारची भूमिका अयोग्य, माझ्या सूचना सर्वोच्च न्यायालयात मांडल्या नाहीत, संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप The role of the Mahavikas Aaghadi goverment on Maratha reservation is inappropriate, my suggestions were not presented in the Supreme Court, Sambhaji Raje Chhatrapati's allegation

    मराठा आरक्षणावर आघाडी सरकारची भूमिका अयोग्य, माझ्या सूचना सर्वोच्च न्यायालयात मांडल्या नाहीत, संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप

    मराठा आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारची भूमिका अयोग्य आहे. राज्य सरकारला मी स्वत: सूचना दिल्या होत्या. माझ्या काही सूचना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडल्या नाहीत असा आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला. The role of the Mahavikas Aaghadi goverment on Maratha reservation is inappropriate, my suggestions were not presented in the Supreme Court, Sambhaji Raje Chhatrapati’s allegation


    प्रतिनिधी

    नाशिक : मराठा आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारची भूमिका अयोग्य आहे. राज्य सरकारला मी स्वत: सूचना दिल्या होत्या. माझ्या काही सूचना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडल्या नाहीत असा आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

    नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारच्या हातात काही गोष्टी आहेत. मात्र त्यांची भूमिकाच अयोग्य आहे. मराठा आरक्षणासाठी जे हातात आहे ते करा हे माझं मुख्यमंत्र्यांना सांगणे आहे. त्यांना नोकरी देण्यात काय अडचण आहे, हे समजत नाही. नियुक्तीची प्रक्रिया का रखडवताय? प्रलंबित असलेल्या नोकऱ्यां चा तातडीनं मार्गी लावा इतर राज्यात आरक्षण मिळालं, मग महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न आहे.



    संभाजीराजे म्हणाले, मी शांत आहे ही महाराजांची शिकवण आहे. पण मला आक्रमक व्हायला दो मिनिटे लागतील. मी आक्रमक होण्यासाठी तयार आहे. पण आधी मार्ग काय काढणार हे सांगा. आंदोलन कसं करायचं हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही. मराठा आरक्षणासाठी मी महाराष्ट्र पिंजून काढतो आहे. अभ्यासू लोकांशी चर्चा सुरू आहे. येत्या 27 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांना भेटणार असून यानंतर यानंतर मुंबईत स्पष्ट भूमिका मांडणार आहे. तोपर्यंत माझी सगळ्या आमदार, खासदारांना वॉर्निंग आहे, मराठा मराठा समाजालाही विनंती आहे की 27 मेपर्यंत शांत रहा.

    सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी झटकत आहेत. पण मराठा समाजाला याचे देणेघेणे नाही असे सांगून संभाजीराजे म्हणाले, माझी सर्वपक्षीय नेत्यांना विनंती की समाजाची दिशाभूल करू नका. जबाबदारी झटकू नका, समाजाला दिलासा द्या.

    The role of the Mahavikas Aaghadi goverment on Maratha reservation is inappropriate, my suggestions were not presented in the Supreme Court, Sambhaji Raje Chhatrapati’s allegation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल